नागपुरातील गुन्हे शाखेचे पाचही युनिट कोरोनाने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:49 AM2020-08-31T10:49:31+5:302020-08-31T10:51:22+5:30

नागपूर शहरातील गुन्हे शाखेच्या 'कमांडर'सह पाचही युनिटमधील कर्मचारी, अधिकारी कोरोनाने बाधित झाल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.

All five units of Nagpur Crime Branch were affected by the corona | नागपुरातील गुन्हे शाखेचे पाचही युनिट कोरोनाने बाधित

नागपुरातील गुन्हे शाखेचे पाचही युनिट कोरोनाने बाधित

Next
ठळक मुद्देपोलिसांच्या कामकाजावर विपरीत परिणामगुन्हेगारांची धरपकड थांबली

नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने गुन्हे शाखेतही शिरकाव केला आहे. शहरातील गुन्हे शाखेच्या 'कमांडर'सह पाचही युनिटमधील कर्मचारी, अधिकारी कोरोनाने बाधित झाल्यामुळे पोलिसांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे.

शहर पोलीस दलात गुन्हे शाखेची महत्त्वाची भूमिका असते. गुन्हे होऊ नये यासाठी सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, त्यांची धरपकड करून त्यांना कोठडीत डांबणे, झालेल्या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगारांना अटक करणे आणि रखडलेल्या विविध पोलीस ठाण्यातील तपासात मदत करणे आदी जबाबदाºया गुन्हे शाखेवर असतात. शहर पोलीस दलात गुन्हे शाखेचे पाच युनिट आहेत. या पाचही युनिटमध्ये कोरोनाने शिरकाव केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांच्यासह प्रत्येक युनिटमधील पोलीस बाधित झालेले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पाचही युनिटच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला असून डिटेक्शन तसेच गुन्हेगारांची धरपकड थांबली आहे.

असा आला कोरोना
वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपींना पकडून त्यांची चौकशी केल्यामुळे गुन्हे शाखेच्या पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुन्हेगारांना पकडताना तो कोरोनाबाधित आहे की नाही, ते समजून येत नाही. त्यामुळे बाधित आरोपीच्या माध्यमातून कोरोना धडधाकट पोलिसांना विळखा घालत आहे. गेल्या दोन आठवड्यात गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच २८ पोलीस कर्मचारी कोरोनामुळे बाधित झाले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कार्यपद्धतीवर अंकुश बसला आहे.

असे आहे बाधित
युनिट १ - ७,

युनिट २ - ३,

युनिट ३ - ९,

युनिट ४ - ३

युनिट ५ - ६

वाहतूक शाखेतही अडसर
कोरोनाने वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसह एकूण २६ जणांना बाधित केले आहे. त्यामुळे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कामकाजात अडसर निर्माण झाला असून कामाची गतीही मंदावली आहे. विशेष म्हणजे, शहर पोलीस दलातील एकूण ६७६ जणांना आजपर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे.
 

 

Web Title: All five units of Nagpur Crime Branch were affected by the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.