चारही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:14+5:302021-04-23T04:10:14+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बनून तयार आहेत. परंतु या इमारतीमध्ये आरोग्य ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बनून तयार आहेत. परंतु या इमारतीमध्ये आरोग्य सुविधा सुरू होऊ शकली नव्हती. यासंदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्ताच्या माध्यमातून प्रकाश टाकला. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रशासनावर दबाव वाढविला. अखेर जिल्हा परिषदेने ही केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून मौदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धानला, नरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भिष्णूर, कामठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भूगाव व उमरेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सालई येथे आरोग्य सेवा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात बाह्य रुग्ण सेवा, कोरोना लसीकरण होणार आहे. दुसऱ्या टप्यात आंतर रुग्ण सेवा सुरू होणार आहे.