नागपुरातील सर्व हज यात्री सुरक्षित

By admin | Published: September 12, 2015 02:51 AM2015-09-12T02:51:22+5:302015-09-12T02:51:22+5:30

नागपुरातून हज यात्रेला निघालेला चौथा जत्था जेद्दाह आणि मक्का दरम्यान थांबवण्यात आला आहे.

All Haj passengers in Nagpur are safe | नागपुरातील सर्व हज यात्री सुरक्षित

नागपुरातील सर्व हज यात्री सुरक्षित

Next


नागपूर : नागपुरातून हज यात्रेला निघालेला चौथा जत्था जेद्दाह आणि मक्का दरम्यान थांबवण्यात आला आहे. यापूर्वी येथून निघालेल्या तीन जत्थ्यातील यात्रेकरू मक्का येथे पोहोचले असून ते सर्वच सुरक्षित असल्याचे सांगितले जाते.
सेंट्रल तंजीम कमिटी (सीटीसी)चे सचिव हाजी मो. कलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरातून हजचे विमान जेद्दाहपर्यंत जाते. तेथून मक्कासाठी जावे लागते. शुक्रवारी रवाना झालेल्या चौथ्या जत्थ्यात ३४० यात्रेकरू दुर्घटनेच्यावेळी जेद्दाह आणि मक्काच्या मार्गावर होते. या जत्थ्यातील यात्रेकरूंना रस्त्यातच थांबवण्यात आल्याचा दावा सीटीसीने केला आहे. तर यापूर्वी रवाना झालेल्या तिन्ही जत्थ्यातील यात्रेकरू मक्का येथेच आहेत. पहिल्या जत्थ्यात ४४९, दुसऱ्यात ३४० आणि तिसऱ्या जत्थ्यात ३४० यात्रेकरू हजसाठी रवाना झाले आहेत. सीटीसी मक्का येथील प्रत्येक घडामोडीची माहिती घेत आहेत.

Web Title: All Haj passengers in Nagpur are safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.