अखिल भारतीय हास्य कवि संमेलनाचे आयोजन रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 09:29 PM2019-09-10T21:29:26+5:302019-09-10T21:31:21+5:30
श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत श्री ज्ञानोदय सेवा संघाद्वारे अखिल भारतीय हास्य कविसंमेलनाचे आयोजन १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. हास्य कविसंमेलनाला अध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रवीण दटके, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अश्विन मुदगल, संदीप जोशी, अतुल कोटेचा, प्रदीप पोहाने, मोहन मते, राहुल माकनीकर, अनिल जैन, दयाशंकर तिवारी, भरतेश जैन, शितल जैन, पंजू तोतवानी उपस्थित राहणार आहे. या संमेलनात ख्यातनाम व राष्ट्रीय स्तरावरील कवि अनामिका अम्बर, सौरभ सुमन, अरुण जेमिनी, शम्भूजी शिखर, पंकज जैन हे सहभाग घेणार असल्याची माहिती श्री ज्ञानोदय सेवा संघाचे अध्यक्ष आशिष जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या आठ वर्षापासून संघाद्वारे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. ते म्हणाले की, गेल्या २५ वर्षापासून संघाद्वारे समाजसेवा करण्यात येत आहे. धर्मार्थ दवाखाना, फिजीओथेरेपी सेंटर चालविण्यात येत आहे. हास्य कविसंमेलनाचे आयोजन पर्यूषण पर्वाच्या समारोपानिमित्त आयोजित केले आहे. यातून समाजाला प्लास्टिकचा वापर टाळा असा संदेशही दिला जाणार आहे. पत्रपरिषदेला राजेश जैन, अभिनंदन जैन, संजय नेताजी, निशांत जैन, राहुल जैन, संदीप माणिक, आदेश मलैया, प्रशांत जैन, मनिष जैन, योगेश जैन, संजय सिंघई, नितीन जैन ठेकेदार, गजेंद्र जैन, आकाश जैन, नीलेश नायक उपस्थित होते.