अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणूक; गडेकर, फरकासे व रहाटे विजयी
By गणेश हुड | Published: April 18, 2023 06:54 PM2023-04-18T18:54:10+5:302023-04-18T18:54:48+5:30
Nagpur News अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणुकीत नागपूर मधील तीन जागांवर प्रस्थापित गटाचे नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, आणि संजय रहाटे विजयी झाले आहेत.
गणेश हूड
नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणुकीत नागपूर मधील तीन जागांवर प्रस्थापित गटाचे नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, आणि संजय रहाटे विजयी झाले आहेत. परिवर्तन गटाचा पराभव झाला.रविवारी रात्री उशिरा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.
सेवा सदन आणि महिला महाविद्यालयात पार पडलेल्या मतदानात १ हजार ४०७ मतदारापैकी ८२८ जणांनी मतदान केले. नाट्य परिषदेच्या दोन गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमिवर या निवडणुकीकडे नाट्यप्रेमिंचे लक्ष लागले होते. परिवर्तन पॅनलकडून सलीम शेख, दिलीप देवरणकर, कुणाल गडेकर तर प्रस्थापित गटाकडून नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, आणि संजय रहाटे रिंगणात होते. तर दिलीप ठाणेकर व सलीम मेहबूब शेख अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले. नाटयपरिषद शाखांच्या सर्वसामान्य सभासदासोबतच कलकारांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अशी पडली मते
नरेश गडेकर- ५४२ (विजयी)
प्रफुल्ल फरकासे- ४७० (विजयी)
संजय रहाटे- ४५९ (विजयी)
सलीम शेख- २६८
दिलीप देवरणकर- २५०
कुणाल गडेकर- २८५
दिलीप ठाणेकर - ४८
सलीम मेहबूब शेख- ९