‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2023 08:29 PM2023-02-09T20:29:08+5:302023-02-09T20:30:46+5:30

Nagpur News ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने नागपूर शहरातील बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

All lakes including Ambazari were contaminated by 'Ecarnia' | ‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

‘ईकाॅर्निया’ने केले अंबाझरीसह सर्व तलाव दूषित

Next
ठळक मुद्देऑक्सिजन घटते, गढूळपणा वाढताेएक वाढली की पूर्ण तलावात फाेफावते

नागपूर : सध्याच्या ग्लाेबल वाॅर्मिंगच्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी झाडांसारखे महत्त्वाचे काहीच नाही. मात्र काही वनस्पती पर्यावरणासाठी हानिकारकही असतात. शेतातील तण पिकांना नुकसानकारकच असतात. तशीच एक तण गटातील वनस्पती आहे, जी नागपूर शहरातील तलावांना खराब करीत आहे. ईकाॅर्निया’ म्हणजेच जलपर्णी अशीच एक वनस्पती आहे, जिने बहुतेक तलावांची जैवविविधता दूषित केली आहे.

अंबाझरी तलावाचे परितंत्र सध्या जलपर्णी वनस्पतीने धाेक्यात आणले आहे. अंबाझरी हा शहरातील पाेहणाऱ्यांना पाेहण्याचा नैसर्गिक अनुभव देणारा तलाव आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या तलावावर पाेहणाऱ्यांची गर्दी असते. एक दिवस पाेहणाऱ्यांना काही जलपर्णी तलावात दिसल्या. त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी संपूर्ण परिसर या वनस्पतीने व्यापला हाेता. लाेकांनी हे तण काढण्याचा प्रयत्न केला; पण ती आणखी फाेफावत जात आहे. त्यामुळे पाेहणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागताे आहे.

- या वनस्पतीने ऐतिहासिक फुटाळा तलावाची एक बाजू अशीच प्रदूषित केली आहे.

- लाेकांच्या घरातील सांडपाणी व वाढलेल्या या वनस्पतीमुळे नाईक तलाव पूर्ण प्रदूषित हाेऊन नामशेष हाेण्याच्या मार्गावर आहे.

- शिवाय जलपर्णी फाेफावल्यामुळे सक्करदरा तलावाचीही विदारक अवस्था झाली आहे.

- त्यामुळे या वनस्पतीने तलावांची जैवविविधता प्रदूषित केली आहे.

 

का हानिकारक आहे ईकाॅर्निया ?

- ईकाॅर्निया ही तण गटातील वनस्पती आहे. शुद्ध पाण्यातून मिळणाऱ्या पाेषक द्रव्यामुळे या वनस्पतीची वाढ झपाट्याने हाेते.

- एक राेपटे जरी तलावात वाढले तर अल्पावधीत संपूर्ण तलाव व्यापून टाकण्याची क्षमता तिच्यात आहे, इतक्या वेगाने तिची वाढ हाेते. ही वनस्पती काेणत्याच प्राण्याचे खाद्य नाही, म्हणून तिचा उपयाेग शून्य आहे.

- या वनस्पतीची पाने थाेडी पसरट व स्पाँजी असतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाला पाण्यात जाण्यापासून राेखतात.

- त्यामुळे तलावातील इतर वनस्पतींची वाढ हाेत नाही. त्या मरतात व नष्टही हाेतात.

- ईकाॅर्नियामुळे तलावातील मासे व इतर जलचर प्राण्यांनासुद्धा ऑक्सिजन मिळत नाही.

- काही दिवसांनी पाने सडतात व पाण्यात मिसळतात. त्यामुळे तलावाचे पाणी वेगाने गढूळ हाेते व पीएच स्तरही वाढताे.

 

पाण्यातील ऑक्सिजन घटवून गढूळपणा वाढविणारी ही वनस्पती आहे. ईकाॅर्निया काेणत्याच प्राण्यासाठी उपयाेगाची नसून तलावांची जैवविविधता प्रदूषित करणारी आहे. सक्करदरा, नाईक तलाव, काेराडी तलाव या वनस्पतीने खराब केला आहे. त्यामुळे तलावातून पूर्णपणे काढून नष्ट करणे, हा एकमेव उपाय आहे.

- डाॅ. उगेमुगे, वनस्पती तज्ज्ञ

Web Title: All lakes including Ambazari were contaminated by 'Ecarnia'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.