‘एमआरओ’मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य

By admin | Published: October 19, 2015 02:35 AM2015-10-19T02:35:01+5:302015-10-19T02:35:01+5:30

मिहान-सेझ परिसरातील एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ (मेन्टेनन्स, रिपेअर, ओव्हरहॉल)मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य होणार आहे.

All-level check of aircraft can be done in 'MRO' | ‘एमआरओ’मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य

‘एमआरओ’मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य

Next

मिहान : उपकरणांसाठी ३० लाख रुपये मंजूर
वसीम कुरैशीे नागपूर
मिहान-सेझ परिसरातील एअर इंडियाच्या ‘एमआरओ’ (मेन्टेनन्स, रिपेअर, ओव्हरहॉल)मध्ये विमानांची सर्व स्तरावरील तपासणी शक्य होणार आहे. हजयात्रेनंतर विमानांची सी-टू स्तरावरील तपासणी केली जाणार आहे. तसेच, बोर्इंग-७७७ विमानांच्या ‘डी’ स्तरीय तपासणीसाठी ‘डीजीसीए’कडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
‘एमआरओ’चे संचालन करीत असलेल्या एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (एआयईएसएल) कंपनीने नागरी उड्डयण महासंचालक (डीजीसीए) यांच्याकडून सी-२ तपासणीची परवानगी मिळविली आहे. ‘एमआरओ’मध्ये १५ बोर्इंग-७७७ विमानांची सी-२ स्तरावरील तपासणी केली जाईल. एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगमध्ये नागपूरने नवीन उंची प्राप्त केली आहे. चार महिन्यांपूर्वी विमानांची तपासणी व दुरुस्तीचा पुढचा टप्पा गाठण्याचे संकेत देण्यात आले होते. यानंतर हजयात्रेची तयारी सुरू झाली. एअर इंडियाची अनेक विमाने हजयात्रेत व्यस्त होती. सी-टू तपासणीच्या मान्यतेनंतर हजवरून परतीचा प्रवास सुरू झाला. यामुळे आॅक्टोबरच्या शेवटपर्यंत विमाने ‘एमआरओ’मध्ये आणली जातील. पहिल्या स्तरात एअर कंडिशनर सिस्टीम, वीज पुरवठा इत्यादी तपासणीचा समावेश असतो.

बी-७७७ करिता परवानगी
सध्या बोर्इंग-७७७ विमानाच्या सी-टू स्तरीय तपासणीकरिता परवानगी मिळाली आहे. विमानांची यास्तरावरील तपासणी नोव्हेंबरपासून सुरू होईल.
-एच. आर. जगन्नाथ, सीईओ, एआयईएसएल.
‘डी’ तपासणीची तयारी
बोर्इंग-७७७ विमानांची ‘डी’ स्तरीय तपासणी अंतिम असते. या तपासणीच्या परवानगीसाठी ‘डीजीसीए’कडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परवानगी मिळाल्यानंतर बोर्इंग-७७७ विमानाच्या देखभाल व दुरुस्तीचे सर्व स्तर पूर्ण होतील.
-मो. एस. एस. काजी, उपमहाव्यवस्थापक व
नागपूर डेपो प्रभारी, एआयईएसएल.

Web Title: All-level check of aircraft can be done in 'MRO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.