कारागृहातून ‘मेगा सर्च ऑपरेशन’पूर्वीच सर्व मोबाईल झाले गायब? ‘पीएसआय’च्या चौकशीतून अनेक खुलासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 01:57 PM2022-09-17T13:57:52+5:302022-09-17T14:01:43+5:30

५ सप्टेंबर रोजी कुख्यात मोक्का गुन्हेगार सूरज कावळे याला कारागृहात ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईल बॅटऱ्या घेऊन पकडण्यात आले होते.

All mobile phones disappeared from the Nagpur Prison before the 'mega search operation'? Many revelations from the investigation of 'PSI' | कारागृहातून ‘मेगा सर्च ऑपरेशन’पूर्वीच सर्व मोबाईल झाले गायब? ‘पीएसआय’च्या चौकशीतून अनेक खुलासे

कारागृहातून ‘मेगा सर्च ऑपरेशन’पूर्वीच सर्व मोबाईल झाले गायब? ‘पीएसआय’च्या चौकशीतून अनेक खुलासे

googlenewsNext

नागपूर : शहरातील पोलीस वर्तुळाला हादरविणाऱ्या नागपूर कारागृहातील मोबाईल व गांजा रॅकेटमध्ये आरोपी ‘पीएसआय’च्या चौकशीतून अनेक बाबी समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहर पोलीस व गुन्हे शाखेने राबविलेल्या ‘मेगा सर्च ऑपरेशन’अगोदरच कारागृहातील मोबाईल व इतर गोष्टी कैद्यांजवळून घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली होती. दरम्यान, ‘पीएसआय’ प्रदीप नितवणेला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

५ सप्टेंबर रोजी कुख्यात मोक्का गुन्हेगार सूरज कावळे याला कारागृहात ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईल बॅटऱ्या घेऊन पकडण्यात आले होते. न्यायालयाच्या आवारात गांजा आणि बॅटऱ्या वाटपाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तपासादरम्यान कारागृहातील निलंबित पीएसआय प्रदीप नितवणे याने मोबाईलची बॅटरी आणि गांजा मागवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्रदीपला अटक केली होती.

कारागृहाचे ‘मोबाईल कनेक्शन’ उघड; 'त्या' पीएसआयनेच बोलविल्या बॅटरीज्, दोन कर्मचारी निलंबित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगार सूरज कावळे याच्या दबावाखाली प्रदीपने भावाला सूरज वाघमारेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले होते. कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल, गांजा आणि इतर आक्षेपार्ह वस्तू असल्याचेही त्याने चौकशीदरम्यान सांगितले. या प्रकरणात कारागृहातील काही कर्मचारी किंवा अधिकारी यांचा समावेश आहे या दिशेनेदेखील चौकशी सुरू आहे.

साडेतीनशे पोलिसांकडून जेलची झाडाझडती; सव्वाचार तास मोहिमेत अवघा ५ ग्राम गांजा हाती

Web Title: All mobile phones disappeared from the Nagpur Prison before the 'mega search operation'? Many revelations from the investigation of 'PSI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.