डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरतर्फे अल्प दरात सर्व प्रकारच्या तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:15+5:302021-04-08T04:08:15+5:30
नागपूर : पंचशील चौकातील डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरतर्फे सर्व प्रकारच्या अचूक तपासण्या अत्याधुनिक यंत्रणाद्वारे अल्पदरात करण्यात येत आहेत. कोठारी चॅरिटेबल ...
नागपूर : पंचशील चौकातील डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरतर्फे सर्व प्रकारच्या अचूक तपासण्या अत्याधुनिक यंत्रणाद्वारे अल्पदरात करण्यात येत आहेत.
कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट आरोग्य क्षेत्रात अग्रेसर काम करणारी एक संस्था आहे. ५० हजारांपेक्षा अधिक डायलिसिस ट्रीटमेंट पुण्यामध्ये अल्पदरात आधुनिक पद्धतीने केल्या आहेत. तसेच आरोग्याविषयी जनजागृतीचे काम संस्थेतर्फे नियमितपणे केले जाते. अनेक लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
कोरोनासारख्या महामारीमुळे लोकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती झाली आहे. प्रत्येकाला आरोग्याविषयी काळजी घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येक आजाराचे निदान हे तपासणी केल्याशिवाय लागत नाही. सेंटरमध्ये सिटी स्कॅन ब्रेनचे ९९९ रुपये, सोनोग्राफी ५०० रुपयापासून, रक्त तपासणीमध्ये शुगर ४० रुपये, थायरॉईड २८० रुपये, तीन महिन्याची अॅव्हरेज शुगर गोल्ड स्टॅण्डर्डद्वारे ३२० रुपये, दातांची तपासणी ५० रुपये, दातांचे रुट कॅनल १५०० रुपये, २डी इको, कलर डॉपलर, ईसीजी, डिजिटल एक्स-रे, स्ट्रेस टेस्ट, पीएफटी तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या उच्च दर्जाच्या मशीनद्वारे केल्या जातात.
आरोग्याविषयी सर्व तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून रुग्णांना जास्त धावपळ न करता आरोग्य सेवेचा लाभ अल्पदरात घेता येईल. आर्थिक अडचणींमुळे अनेकांची तपासणी होत नाही. त्यामुळे आरोग्याविषयी तक्रारीत वाढ झाली आहे. आर्थिक बोजा पडू नये म्हणून सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या अल्पदरात लोकांच्या सेवेकरिता उपलब्ध केलेल्या आहेत. (वा.प्र.)