अमेरिकेतील अभियंत्यावर छळाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 11:18 PM2020-11-06T23:18:41+5:302020-11-06T23:21:44+5:30
Allegations of harassment American engineer, crime news अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या व्यक्तीवर त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप लावला. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या व्यक्तीवर त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप लावला. अजनी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नितीन शितलप्रसाद शर्मा (वय ४४) असे या प्रकरणात मुख्य आरोपीचे नाव आहे. नितीन अमेरिकेत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नोकरी करतो. कीर्ती (वय ३८) सोबत त्याचे २०१४ ला लग्न झाले. विशेष म्हणजे दोघांचेही दुसरे लग्न होते. काही दिवस त्यांचे व्यवस्थित होते. नंतर मात्र, माहेरून पाच लाख रुपये आणावे म्हणून नितीन, त्याचे वडील शितलप्रसाद शर्मा, भाऊ मुकेश शर्मा, मुकेशची पत्नी कविता, दीर साईराम, जाऊ प्रियंका आणि प्रतीक कडे (सर्व रा. हावरापेठ,अजनी) हे छळत असल्याचे कीर्तीने तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी स्त्रीधनही स्वतकडे ठेवून घेतल्याचा आरोप लावला आहे. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुरुवारी उपरोक्त मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याचे अजनीचे ठाणेदार प्रदीप रायन्नावार यांनी सांगितले.