२० लाखांच्या खंडणीसाठी तरुणीचे कथित अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 10:42 AM2021-08-07T10:42:08+5:302021-08-07T10:44:42+5:30

Nagpur News २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका तरुणीचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा भल्या सकाळी शहरात वायुवेगाने पसरली. त्यामुळे खळबळ उडाली.

Alleged abduction of a young woman for a ransom of Rs 20 lakh | २० लाखांच्या खंडणीसाठी तरुणीचे कथित अपहरण

२० लाखांच्या खंडणीसाठी तरुणीचे कथित अपहरण

Next
ठळक मुद्देउलटसुलट चर्चेला उधाण तरुणी सुखरूप, दोन संशयित ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका तरुणीचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा भल्या सकाळी शहरात वायुवेगाने पसरली. त्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून दोन तासातच या कथित अपहरणनाट्याचा शेवट केला. तरुणी सुखरूप असून पोलिसांनी तिच्या मित्रासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका संपन्न परिवारातील १९ वर्षीय तरुणी शुक्रवारी सकाळी बेपत्ता झाली. तिच्या मोबाईलवरून सकाळी ७ च्या सुमारास तिच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन आला. तरुणीचे अपहरण करण्यात आले असून तिच्या सुटकेसाठी २० लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असे पलीकडून बोलणाराने धमकावले. पुढच्या अर्ध्या तासात खंडणीसाठी आणखी पाच ते सात फोन कॉल्स वडिलांना आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

इमामवाडा पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्याची तात्काळ दखल घेत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी लगेच संपूर्ण शहर पोलीस यंत्रणा तपासासाठी कामी लावली. सायबर शाखेचे एक स्वतंत्र पथक मुलीचे लोकेशन शोधू लागले. सक्करदऱ्यातील महाकाळकर सभागृहाजवळ लोकेशन ट्रेस झाले. या भागातील ७० ते ८० पोलीस तरुणीचा शोध घेऊ लागले. मोठा पोलीस ताफा दिसल्यामुळे कथित अपहरणकर्ते घाबरले. तरुणीने वडिलांना फोन करून सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला तसेच तिच्या एका मित्रासह दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात तिघांकडूनही विसंगत माहिती येत असल्यामुळे या प्रकरणातील वास्तव उजेडात आले नव्हते.

 

३० लाखांची बीएमडब्ल्यू

या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांकडून नेमकी माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे उलटसुलट चर्चेत आणखीच भर पडली होती. या प्रकरणात तरुणीचाही सहभाग असल्याची चर्चा होती. तरुणी आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे ती तिच्या मित्राला नेहमीच मोठी रक्कम देत होती. कोणताही कामधंदा न करणाऱ्या या तरुणाजवळ ३० लाखांची बीएमडब्ल्यू असून तरुणीनेच त्याला ती घेऊन दिल्याची माहिती नागरिक देत होते.

----

Web Title: Alleged abduction of a young woman for a ransom of Rs 20 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण