आर्यन खानच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 06:37 PM2021-10-18T18:37:44+5:302021-10-18T18:38:43+5:30

Nagpur News शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली, असा गंभीर आरोप केला आहे.

Alleged violation of Aryan Khan's fundamental rights | आर्यन खानच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा आरोप

आर्यन खानच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचा आरोप

Next
ठळक मुद्देशिवसेना नेते किशोर तिवारी यांची प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी


नागपूर : शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अमली पदार्थ सेवन प्रकरणामध्ये आर्यन खानच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली, असा गंभीर आरोप केला आहे, तसेच या प्रकरणाची सखोल न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Alleged violation of Aryan Khan's fundamental rights)


अमली पदार्थ नियंत्रण पथकाने मुंबई झोन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या २ आॅक्टोबरला अरबी समुद्रातील एका आलिशान जहाजावरील रेव्ह पार्टीत छापा टाकला. दरम्यान, पथकाने विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले, तसेच बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन व इतर आरोपींना अटक केली. ही कारवाई प्रामाणिक उद्देशाने करण्यात आली नाही, असे तिवारी यांचे म्हणणे आहे.

मुंबई झोन संचालक समीर वानखेडे यांची पत्नी मराठी अभिनेत्री असून त्यांना बॉलिवूडमध्ये नावलौकिक मिळवायचा आहे. त्यामुळे अमली पदार्थ नियंत्रण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडमधील मोठे अभिनेते, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मॉडेल्स, निमार्ते, दिग्दर्शक आदींना लक्ष्य केले आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासाआड बेकायदेशीर कारवाया केल्या जात आहेत. त्यामागे वानखेडे व इतर अधिकाऱ्यांचा वाईट हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लवकरच सत्य पुढे आणण्याचा दावा केला आहे. परिणामी, प्रकरणाची सखोल न्यायिक चौकशी होणे गरजेचे आहे, असे तिवारी यांनी याचिकेत नमूद केले आहे.

आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. एनडीपीएस कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देण्यासाठी २० आॅक्टोबर ही तारीख निश्चित केली आहे. ही आर्यनची पिळवणूक आहे. कायद्यानुसार, या न्यायालयाने आर्यन व इतर आरोपींच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय देणे आवश्यक होते. परंतु, या न्यायालयाने कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आर्यन व इतर आरोपींचे मूलभूत अधिकार बाधित झाले, याकडेही तिवारी यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Alleged violation of Aryan Khan's fundamental rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.