Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात आघाडीला यश मिळणार : जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:38 PM2019-10-09T23:38:21+5:302019-10-09T23:39:11+5:30
नागपूर जिल्ह्यातील बहुतांश जागांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बहुतांश जागांवर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना यश मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला.
मुळक रामटेक, कामठी व उमरेड मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या पदयात्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. या वेळी अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव मुकुल वासनिक उपस्थित होते. मुळक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले, शेतकरी, शेतमजूर, युवकांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. राज्य विकासात मागे गेले आहे. येत्या काळात जनता यांना धडा शिकवेल व काँग्रेसला साथ देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दौऱ्यात किशोर गजभिये, एस.क्यू. जमा, साजा शफआत अहमद, दीपक काटोले, शकुर नागाणी, कृष्णा यादव, नाना कंभाले, अस्लम शेक ,मातीन खान, शिव यादव, नौशाद सिद्दीकी, आयफज अहमद साइदा, कलीम तापेश्वर वैद्य, तुळशीराम काळमेघ, अब्दुल मतीन खान ,काशीनाथ प्रधान, नीरज लोणारे, मंदा मिलिंद चिमणकर, सुरय्या बेगम, मो.आरिफ कुरैशी, मुश्ताक अहमद, सईद अफरोज, मीनाक्षी बुरबुरे, आलिया तब्बसुम, मो. तारीफ सदस्य, सफिया कौसर, वैशाली प्र. मानवटकर, ममता राजेश कांबळे, आनंदराव देशमुख, तुळशीराम काळमेघ, शिवकुमार यादव, अशोक बर्वे, असलम शेख, कैलास राऊत, पिटी रघुवंशी, इजराइल शेख, दामोदर धोपटे, हर्षवर्धन निकोसे, मोहन यादव, दुगार्ताई लोंढे, शुभांगी रामेलवार, भाऊराव रहाटे, रमेश बिलानवार, माधुरी उईके, विजय पांडे, रोशन मेश्राम, अपर्णा वासनिक, उर्मिला खुडसाव, कांचन धानोरे, आम्रपाली भिवगडे, बबलू बर्वे ,मोहन भगत ,संतोष बोरीकर, रोहित ताटी, योगेश गोस्वामी, शंकर अहाके तसेच, शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआय, इंटक ,अल्पसंख्यक संघटनेचे पदाधिकारी, अनुसूचित जाती जमाती संघटनेचे व कार्यकर्ते उपस्थित होते.