Vidhan Sabha Election 2019; रॅण्डमायझेशन पद्धतीनुसार मतदान यंत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:15 AM2019-10-01T11:15:37+5:302019-10-01T11:16:29+5:30
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या रॅण्डमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र्र ठाकरे यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनच्या रॅण्डमायझेशन (सरमिसळ) प्रक्रिया सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ करिता नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघनिहाय (काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी, रामटेक, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम व नागपूर उत्तर) मतदान यंत्रांचे रॅण्डमायझेशन (सरमिसळ) पद्धतीने प्रथमस्तरीय चाचणीत सुव्यवस्थित असलेल्या यंत्राची (सरमिसळ) प्रक्रिया करण्यात आली.
जिल्ह्यातील १२ विधानसभेच्या ४ हजार ४१२ मतदान केंद्रांसाठी एकूण ५ हजार २९९ बॅलेट युनिट, ५ हजार २९९ कंट्रोल युनिट तर ५ हजार ७४२ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रांचे रॅण्डमायझेशन (सरमिसळ) पद्धतीने यावेळी वाटप करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील सर्व १२ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान यंत्रांचे ईएमएस मोबाईल अॅपद्वारे स्कॅन करून संबंधित विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे वाटपाकरिता तयार ठेवण्यात आले आहेत.
मतदान केंद्राच्या संख्येच्या २० टक्के अधिक बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तर ३० टक्के अधिक व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात येतात.