जाहिरात दिल्यानंतर सहा आठवड्यांत जमिनीचे वाटपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:07 AM2021-07-16T04:07:33+5:302021-07-16T04:07:33+5:30

नागपूर : मिहानमधील जागा वाटपाची प्रक्रिया प्रचंड रेंगाळत असल्याचे चित्र होते. मात्र, मिहानमध्ये सकारात्मकता परत आणण्यासाठी आणि मिहान प्रकल्प ...

Allotment of land within six weeks after advertisement | जाहिरात दिल्यानंतर सहा आठवड्यांत जमिनीचे वाटपपत्र

जाहिरात दिल्यानंतर सहा आठवड्यांत जमिनीचे वाटपपत्र

googlenewsNext

नागपूर : मिहानमधील जागा वाटपाची प्रक्रिया प्रचंड रेंगाळत असल्याचे चित्र होते. मात्र, मिहानमध्ये सकारात्मकता परत आणण्यासाठी आणि मिहान प्रकल्प संबंधित असलेली काही नकारात्मक धारणा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अंतर्गत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (सेझ) मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व नर्सिंग होमसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. जाहिरात जारी केल्यापासून केवळ सहा आठवड्यांत वाटपपत्र देण्यात आले, हे विशेष.

विदर्भातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या मिहान प्रकल्पात जमीन वाटपावर गुंतवणूकदारांचा कल बदलण्याचा प्रयत्न असून कंपनीच्या प्रस्तावानंतर तातडीने जमीन वाटपाचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली.

संबंधित जमिनीसाठी एकूण सहा निविदा आल्या होत्या. तांत्रिक फेरीनंतर सर्व सहा निविदाकार पात्र ठरले. निविदा उघडल्यानंतर नरेंद्र जिचकार यांच्या सर्वाधिक बोली लावणाऱ्या अंजनी लॉजिस्टिकला जमीन वाटपपत्र देण्यात आले. त्यांना ०.३० एकर जागा देण्यात आली. या जागेसाठी १.१० कोटींचा महसूल मिळाला. ही प्रक्रिया सहा आठवड्यांतच आटोपली, असे कपूर यांनी सांगितले.

मागील काही महिन्यांत एमएडीसीने आयटी क्षेत्रातील पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीस, विमानसेवा क्षेत्रातील कल्पना सरोज एव्हिएशन आणि आता आरोग्य क्षेत्रातील अंजनी लॉजिस्टिकला जमीन दिली आहे. मिहानमध्ये आधीच १५० एकरात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स) कार्यरत आहे. मिहानमधील सेझच्या बाहेरील भागात फर्स्ट सिटी, महिंद्रा ब्लूमडेल, मोराज वॉटरफॉल या मोठ्या टाऊनशिप आहेत. अंजनी लॉजिस्टिकला दिलेली जमीन या भागातील आरोग्य सुविधांची गरज पूर्ण करेल. आरोग्य क्षेत्रामध्ये करिअर शोधणाऱ्या शेकडो तरुणांसाठी रोजगार निर्मितीदेखील करेल, असा विश्वास दीपक कपूर यांनी व्यक्त केला.

Web Title: Allotment of land within six weeks after advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.