शासनात वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचेही परीक्षण व्हावे - नितीन गडकरी

By आनंद डेकाटे | Published: July 22, 2023 04:43 PM2023-07-22T16:43:40+5:302023-07-22T16:44:10+5:30

१३३ उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

Along with financial audit in government, performance should also be audited - Nitin Gadkari | शासनात वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचेही परीक्षण व्हावे - नितीन गडकरी

शासनात वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचेही परीक्षण व्हावे - नितीन गडकरी

googlenewsNext

नागपूर : शासनामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचे चुकीचे निर्णय लोकांना त्रास देतात. त्यामुळे वित्तीय परीक्षणासोबतच कामगिरीचे परीक्षणसुद्धा होणे आवश्यक आहे. पारदर्शकता, संवेदनशीलता, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, वेळ मर्यादित निर्णय प्रक्रिया या गोष्टी युवकांनी आपल्या शासकीय सेवेमध्ये लक्षात ठेवाव्यात, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

रोजगार मेळाव्यात सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये भरती केलेल्या ७० हजारांपेक्षा अधिक नवीन उमेदवारांना दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रे वितरणच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी संबोधित केले. देशभरात ४४ ठिकाणी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरमध्ये धरमपेठच्या वनामती सभागृहात झालेल्या रोजगार मेळाव्यात शासकीय नोकरी मिळालेल्या उमेदवारांना संबोधित करताना गडकरी बोलत होते. याप्रसंगी नागपूर आयकर विभागाच्या प्रमुख आयुक्त वसुंधरा सिन्हा, मुख्य आयुक्त आर. प्रसाद प्रामुख्याने उपस्थित होते.

जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक म्हणून तुम्ही शासकीय सेवेत लोकांची सेवा करा नियमांचे पालन करा. गुणवत्तापूर्ण कामगिरीकडे लक्ष द्या, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. नागपूरच्या रोजगार मेळाव्यात एकूण १३३ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले असून यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय रेल्वे, भारतीय डाक विभाग, आयकर विभाग, भारतीय खाद्य निगम यासारख्या १३ विभागांचा समावेश होता.

Web Title: Along with financial audit in government, performance should also be audited - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.