रामटेक, कन्हानमध्येही रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:09 AM2021-03-31T04:09:57+5:302021-03-31T04:09:57+5:30
रामटेक तालुक्यात मंगळवारी ४८ नवीन रुग्ण आढळून आले. यात शहरातील २३ तर ग्रामीण भागातील २५ रुग्ण आहेत. रामटेक शहरातील ...
रामटेक तालुक्यात मंगळवारी ४८ नवीन रुग्ण आढळून आले. यात शहरातील २३ तर ग्रामीण भागातील २५ रुग्ण आहेत. रामटेक शहरातील २३ रुग्णांमध्ये टिळक वाॅर्ड व भगतसिंह वाॅर्डातील प्रत्येकी चार, महात्मा फुले वाॅर्डातील तीन, राधाकृष्ण वाॅर्ड, सुभाष वाॅर्ड व महात्मा गांधी वाॅर्डातील प्रत्येकी दाेन, अंबाळा वाॅर्ड व शनिवारी वाॅर्डमधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. तालुक्यातील २५ रुग्णांमध्ये वाहिटोला येथील सहा, शीतलवाडी येथील चार, पथरई येथील तीन, झिंझेरिया व परसोडा येथे प्रत्येकी दाेन तर माद्री, वडंबा, कामठी, सिंदेवाही, देवलापार, चिचाळा, शिवणी व सालईमेटा येथील प्रत्येकी एक रुग्ण काेराेना पाॅझिटिव्ह आहे. तालुक्यात आजवर एकूण १,७७८ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील १,२५२ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे तर, ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार यांनी संयुक्तरीत्या दिली.
कुही तालुक्यातील चार प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत मंगळवारी २८७ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली. यात ३३ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या नवीन रुग्णांमध्ये कुही शहरातील दाेन, मांढळ येथील १७, वेलतूर येथील पाच, तितूर येथील दाेन, बोरी (सदाचार) येथील तीन तसेच सोनपुरी, वडेगाव (काळे), मोहगाव व आकोली येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या ३३ रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णांची संख्या ९९२ झाली आहे.
माैदा तालुक्यात मंगळवारी एकूण ११८ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली. यातील २८ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण काेराेना रुग्णांची संख्या १,०३२ झाली असून, यातील ८०५ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. शिवाय, ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सध्या १९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली. नरखेड तालुक्यातही मंगळवारी १९ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात शहरातील चार तर ग्रामीण भागातील १४ रुग्ण आहेत. या १४ रुग्णांमध्ये सावरगाव येथील नऊ, जलालखेडा येथील पाच व मेंढला येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१७ असून, यात शहरातील ८६ व ग्रामीण भागातील ४३१ रुग्णांचा समावेश आहे.