वीजखांबावरील ॲल्युमिनीअम तारा लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:12+5:302021-05-13T04:09:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : अज्ञात आराेपीने शेतातील १२ वीजखांबांवरील ॲल्युमिनीअम विद्युततारा चाेरून नेल्या. तसेच आठ शेतकऱ्यांच्या शेतातील माेटारपंपाच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : अज्ञात आराेपीने शेतातील १२ वीजखांबांवरील ॲल्युमिनीअम विद्युततारा चाेरून नेल्या. तसेच आठ शेतकऱ्यांच्या शेतातील माेटारपंपाच्या विद्युतखांबावरील तारासुद्धा आराेपीने कटरच्या साहाय्याने कापून लंपास केल्या. ही घटना मंगळवारी (दि.११) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली.
वग व पारडी येथील शेतकरी नीलकंठ आत्माराम राघाेर्ते, किशाेर हरिभाऊ मते, पुरुषाेत्तम तानबा मंगर, सुधाकर नीलकंठ तळेकर, सुनील डाेणेकर, श्रीराम जागाेबा तळेकर, हिंदलाल ईस्तारी उके, नरहरी शामराव पंचबुद्धे यांच्या शेतातील माेटारपंपाच्या विद्युतखांबावरील तारा कापून नेल्याचे बुधवारी आढळून आले. शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता, १२ विद्युतखांबावरील ॲल्युमिनीअम तारा आराेपीने चाेरून नेल्याचे आढळले. आराेपीने बुराडे यांच्या शेतातील वीज डीपीवरील ग्रिप काढून वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर वीजखांबावरील तारा कापून चाेरून नेल्या.
परिसरात काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. विद्युततारा चाेरून नेल्याने या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज कंपनीने तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी वीज कर्मचाऱ्यांना घटनेची सूचना दिली. माहिती मिळताच कनिष्ठ अभियंता लवानकर, पाटील यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. चाेरट्यांनी अंदाजे दाेन लाख रुपये किमतीच्या ॲल्युमिनीअम तारा चाेरून नेल्याचे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले.