मी खलनायक आहे काय? श्रीपाद जोशी यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 10:08 PM2019-01-09T22:08:56+5:302019-01-09T22:09:57+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Am I a villain? The question of Shripad Joshi | मी खलनायक आहे काय? श्रीपाद जोशी यांचा सवाल

मी खलनायक आहे काय? श्रीपाद जोशी यांचा सवाल

Next
ठळक मुद्देसंमेलनावर बहिष्कार न घालण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधला. केवळ लिहिलेला मसुदा हा अध्यक्षांचा निर्णय आहे, अशी प्रतिमा निर्माण करून मला खलनायक, दहशतवादी ठरविल्या गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मी खलनायक आहे का, असा भावनिक सवाल त्यांनी केला. हे कारस्थान कुणी रचले गेले, याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यामागे ज्यांची चूक आहे ते जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजकांच्या अडचणी लक्षात घेत यवतमाळचे साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी माझा प्रयत्न होता. मात्र मसुदा लिहून दिला आणि मीच खलनायक ठरलो. महामंडळ हे पळपुट्यांचा अड्डा आहे असे कथानक रंगवल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी भाषा, संस्कृतीची इतकी अवहेलना होत आहे हे दु:खदायक व क्लेशदायक आहे म्हणून राजीनामा दिल्याचे जोशी यावेळी बोलले. राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याने धमकी दिली आणि हे नाहक नाट्य निर्माण केले. मात्र राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली ही मोठी बाब असल्याचे सांगत राजीनामा देण्यामागे त्यांचीही प्रेरणा असल्याचे ते म्हणाले. मी डाव्या किंवा उजव्या कुठलाही विचारसरणीचा नाही. नयनतारा सहगल या उच्च कोटीच्या लेखिका आहेत. त्यांच्याबद्दल गैरसमज करून वाद उभा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेणाऱ्या साहित्यिक मित्रांची भूमिका योग्य आहे आणि मी पदावर नसतो तर मी सुद्धा त्यांच्या सोबत असतो. असे असले तरी संमेलनावर बहिष्कार घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
 नयनतारा यांना भेटणार
संमेलनात सहभागी होणार की नाही, यावर सरळ उत्तर देणे त्यांनी टाळले. एक सामान्य प्रतिनिधी म्हणून सहभागी होईल, असे ते म्हणाले. दरम्यान या सगळ्या वादविवादामुळे प्रज्ञावंत लेखिका नयनतारा सहगल यांच्या भावना दुखावल्या असतील तसेच त्यांच्या न येण्याने जे दुखावले असतील त्यांच्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आयोजकांनी सौजन्य दाखविले नसले तरी मी डेहरादूनला जाऊन सहगल यांची माफी मागणार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Am I a villain? The question of Shripad Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.