अमरस्वरूप, पुलक मंचतर्फे साड्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:39+5:302021-03-06T04:08:39+5:30

नागपूर : अमरस्वरूप फाऊंडेशन व पुलक मंच परिवार संचालित प्रकल्प कबाड से जुगाड अंतर्गत शुक्रवारी पोलीस मदत केंद्र पोटेगाव, ...

Amaraswarup, distribution of sarees by Pulak Manch | अमरस्वरूप, पुलक मंचतर्फे साड्यांचे वितरण

अमरस्वरूप, पुलक मंचतर्फे साड्यांचे वितरण

Next

नागपूर : अमरस्वरूप फाऊंडेशन व पुलक मंच परिवार संचालित प्रकल्प कबाड से जुगाड अंतर्गत शुक्रवारी पोलीस मदत केंद्र पोटेगाव, गडचिरोलीला ५० व जनसंघर्ष समितीला लाहेरी येथे विश्व महिला दिवसाच्या पर्वावर वितरित करण्यासाठी २० नव्या साड्या सोपविण्यात आल्या. समितीचे सदस्य दत्ता शिर्के व आशिष हाडके यांनी त्यांचा स्वीकार केला. यावेळी अखिल दिगंबर सैतवाळ जैन संस्थेचे विदर्भ विभागीय सचिव राजेंद्र नखाते, पुलक मंचचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, संजय नखाते, रमेश उदेपूरकर, अमोल भुसारी, निर्मल शाहू, राहुल मोहर्ले, नितीन लांबाडे, मनिषा नखाते, प्रतिभा नखाते, ऋतुजा वंजारी उपस्थित होते.

------------

ऑटोचालक संघाने केली ऑटो स्टॅण्डची मागणी ()

नागपूर : डिप्टी सिग्नल येथील ऑटोचालकांनी ऑटो चालक संघाच्या मार्फत परिसरात ऑटो स्टॅण्ड बनविण्याची मागणी केली. डिप्टी सिग्नल छत्तीसगढ बँक परिसरात स्टॅण्डसाठी योग्य जागा देण्यासाठी आ. कृष्णा खोपडे, महापौर दयाशंकर तिवारी व पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी ईश्वर कावरे, सचिन करारे, शैलेश नेताम, राजेश गुंजेले, महेश यादव, विकास कौसले, महेश नेताम, मन्नू साहू, महेंद्र नेताम, महेश मिर्चानी, आशाराम वर्मा, राजेंद्र राऊतराय, भारत नेताम, जिवराखन केकती, सेवाराम साहू, बीरसिंह वर्मा, जनक बघेल, आशाराम बघेल, दीपक बंजारे, देवेंद्र राऊतराय, भिखम साहू, जीवन साहू, दिनेश बनपेला, लखन वर्मा, महेंद्र गंजीर, संतोष सोनगेरवा, ललित साहू उपस्थित होते.

-------------

पं. उमेश शर्मा यांचा सत्कार ()

नागपूर : श्री पोद्दोरेश्वर राममंदिर येथून निघणाऱ्या शोभायात्रेचे प्रवर्तक पं. उमेश शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. लोकेंद्र सिंह व विदर्भ सेवा समितीचे संरक्षक डॉ. मनमोहन डागा यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी समितीचे अध्यक्ष आनंद निर्बाण, उपाध्यक्ष मनिष मेहता, बाबूभाई पाटीदार, प्रमोद शुक्ला, विजय शर्मा उपस्थित होते. आभार बाबूलाल नेवटिया यांनी मानले.

-----------

आरिफ खान यांचा सत्कार ()

नागपूर : बंगाल निवडणूकीत प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान यांना निवडणूक स्क्रुटनी समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अतिक कुरैशी व शहर अल्पसंख्यक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इरशाद शेख यांनी त्यांचा सत्कार केला.

----------

सुमत जैन यांचा सत्कार ()

नागपूर : जैन राजनितिक चेतना मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष सुमत लल्ला जैन यांचा सत्कार करण्यात आला. मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम व स्थानिक संस्था कर अधिकारी संजय दहीकर यांनी हा सत्कार केला. कोरोना काळात मनपासोबत अनेक स्वयंसेवी संस्थानी सहकार्य केले. सुमत लल्ला जैन यांनीही सेवा दिली. त्याच कार्यासाठी हा सत्कार करण्यात आला.

------------

गायत्री परिवारतर्फे ‘आपके द्वार हरिद्वार’ ()

नागपूर : गायत्री परिवारच्या वतीने ‘आपके द्वार पहुंजा हरिद्वार’ अभियान राबविण्यात येत आहे. गायत्री शक्तीिपिठ व गायत्री प्रज्ञा पीठ च्या विविध महिला मंडळांद्वारे वेगवेगळ्या चमू घरोघरी जाऊन हे अभियान राबवित आहेत. शुक्रवारी गजानन महाराज प्रकट दिनोत्सवाच्या पर्वावर पश्चिम नागपूरातील यशोदानगर महिला मंडळाचे कार्यक्रमाची सुरुवात केली. महिला मंडळ प्रमुख कल्पना बिसेन यांच्या नेतृत्त्वात हे अभियान सुरू आहे. यावेळी सोना राजपूत, पुष्पा रोकडे, शोभा गणगने, कुसुम खुबाडकर, माला पटले, विरता बिसेन, मंगला माकडे, अनिता रावत, वंदना बैस, स्विटी ठाकूर, गीता झाडे, सरस्वती सूर्यवंशी उपस्थित होत्या.

..

Web Title: Amaraswarup, distribution of sarees by Pulak Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.