अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

By Admin | Published: July 13, 2017 02:48 AM2017-07-13T02:48:38+5:302017-07-13T02:48:38+5:30

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला निंदनीय आहे. दहशतवाद्यांना शांततेची भाषा समजत नाही.

Amarnath yatra attack invasion | अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

googlenewsNext

मध्य नागपुरात दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन : अनिस अहमद यांच्या नेतृत्वात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला निंदनीय आहे. दहशतवाद्यांना शांततेची भाषा समजत नाही. त्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर देण्याची गरज आहे, अशी मागणी करीत मध्य नागपुरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
माजी मंत्री अनिस अहमद यांच्या नेतृत्वात दोसर भवन चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी दहशतवाद्यांविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नगरसेवक झुल्फीकार अहमद भुट्टो, सैयद निजाम बेगम, रिंकु जैन, इरफान काजी, शकील खान आदी उपस्थित होते. या वेळी अनिस अहमद म्हणाले, देशाच्या एकता व अखंडतेला तडा देण्याच्या दूषित हेतूने अमरनाथच्या भाविकांवर दहशवाद्यांनी हल्ला केला आहे. मात्र, अशा घटनांनी भारतवासी घाबरणारे नाहीत. अशा हल्ल्यांनी आस्था कमी होणार नाही. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारने कडक पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली. अतुल कोटेचा यांनीही हल्ल्याचा निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे भाविकांचे मनोबल खचणार नाही. अशा घटनांना देश घाबरत नाही, असे सांगत या दहशतवाद्यांना कडक उत्तर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंदोलनात बंटी अब्बुमिया, महेश अग्रवाल, मनीष छल्लानी, सूरज त्रिपाठी, राजेश अग्रवाल, नूरभाई, मिराज खान, इमरान शेख, शानु खान, जलालुद्दीन अंसारी, रियाज अहमद, महेश बनोदे, राजेश सोनकुसरे, प्रवीण निकम, शुभम कोलाटकर आदींनी भाग घेतला.

Web Title: Amarnath yatra attack invasion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.