अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांचं विमान नागपुरात येताच सिक्युरिटी अॅलर्ट वाजला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 11:24 AM2018-06-24T11:24:31+5:302018-06-24T11:25:24+5:30
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस शनिवारी २३ जूनला नागपुरात आले. निमित्त होते, विमानाच्या सिक्युरिटी अलर्टचे!
- नरेश डोंगरे
नागपूर : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस शनिवारी २३ जूनला नागपुरात आले. निमित्त होते, विमानाच्या सिक्युरिटी अलर्टचे! परिणामी त्यांनी येथील विमानतळावर त्यांच्या चार्टर्ड प्लेनची सिक्युरिटी चेकिंग करून घेतली अन् इंधनही भरले.
होय, जागतिक बाजारपेठेला नवा आयाम देणारे अन् कुठलीही खरेदी एका क्लिकवर आणणारे अॅमेझॉन या जगप्रसिद्ध आॅनलाईन खरेदी-विक्री संकेतस्थळाचे सीईओ जेफ बेजोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. खास सूत्रांच्या माहितीनुसार, जेफ पत्नी आणि मुलांसह त्यांच्या खासगी विमानाने शनिवारी, २३ जूनला सकाळी औरंगाबाद-एलोराकडे निघाले होते. त्यांच्या पायलटने त्यांना नागपूरच्या आकाशात आल्यानंतर सिक्युरिटी अलर्ट दिला. त्यामुळे त्यांचे विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यासाठी परवानगी मागू लागले. एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून ग्रीन सिग्नल मिळताच सकाळी ११ च्या सुमारास त्यांचे विमान येथील विमानतळावर उतरले. येथे त्यांनी विमानात इंधन भरले अन् विमानाची सुरक्षा तपासणी (सिक्युरिटी चेकिंग) करून घेतली. पायलट हे करवून घेत असताना जेफ यांनी विमानतळ प्रशासनाकडून आदरातिथ्याचा स्वीकार केला. खाकी रंगाचा बर्मुडा आणि पांढरे फुल्ल शर्ट अशा वेशातील जेफ यांनी शर्टाच्या बटनात काळा गॉगल अडकवला होता आणि डोक्यावर कॅपही घातली होती. विमानतळावर साधारणत: तासभराच्या मुक्कामात येथील काही कर्मचाºयांनी त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता, येथील महिला-पुरूष कर्मचाºयांसोबत हसतमुख पोज देत छायाचित्र काढून घेतले अन् हाय, हॅलो करीत येथून औरंगाबादला निघून गेले. जेफ बेजोस नागपुरात विमानतळावर इंधन खरेदी चार्टर्ड प्लेनचे सिक्युरिटी चेकिंगही करून घेतली.
सुरक्षेची उलटसुलट चर्चा
विशेष म्हणजे, जेफ नागपुरात आल्यानंतर शहरात वेगळीच चर्चा पसरली. वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे त्या अनुषंगाने विचारणा झाली. आंतरराष्टÑीय वलय असलेल्या व्यक्तीबाबतची अफवा झपाट्याने पसरू शकते, हे ध्यानात आल्याने वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी तातडीने शहानिशा करून घेतली. त्यानंतर जेफ नागपुरात आले होते. येथून ते औरंगाबादला गेले अन् आता (रात्री ९ च्या सुमारास) ते वाराणसी येथे असल्याचे पोलीस अधिकाºयांनी सांगितले. फोर्ब्सच्या यादीनुसार जेफ सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ते १४१.९ अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी अॅमेझॉनच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेला नवे आयाम दिले आहे. केवळ जेफ यांच्या कल्पनेतूनच हे सर्व शक्य झाले आहे.