मेट्रोच्या गॅलरीतून दिसेल अंबाझरी तलाव

By Admin | Published: June 19, 2017 02:19 AM2017-06-19T02:19:30+5:302017-06-19T02:19:30+5:30

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व-पश्चिम कॉरिडोअर अंतर्गत अंबाझरी मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये एक किमी लांब प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येणार आहे.

Ambazari lake in metro gallery | मेट्रोच्या गॅलरीतून दिसेल अंबाझरी तलाव

मेट्रोच्या गॅलरीतून दिसेल अंबाझरी तलाव

googlenewsNext


धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन अ‍ॅक्वा थीमवर

आनंद शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत पूर्व-पश्चिम कॉरिडोअर अंतर्गत अंबाझरी मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये एक किमी लांब प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येणार आहे. या गॅलरीमधून रेल्वे प्रवासी आणि पर्यटक अंबाझरी तलावाचे विहंगम दृष्य पाहू शकतील. धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्टेशनचे मुख्य आकर्षण म्हणजे ही गॅलरीच राहील. यासोबतच या मेट्रो स्टेशनचे बांधकाम अ‍ॅक्वा थीमवर आधारित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रबंध निदेशक बृजेश दीक्षित यांनी लोकमतशी बोलताना दिली.
बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू झाले आहे. येथील रस्त्याच्या एका बाजूला काम सुरू झाले आहे. संपूर्ण रेल्वे स्टेशनचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
या स्टेशनचे विशेष आकर्षण म्हणजे धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशन ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत तब्बल एक किमी लांब गॅलरी खास पर्यटन व प्रवाशांसाठी तयार करण्यात येणार आहे. या गॅलरीच्यावर मेट्रो रेल्वेचे प्लेटफॉर्म बनविले जातील. या गॅलरीमध्ये जाण्यासाठी सुद्धा तिकीट काढावी लागेल.
या गॅलरीमधून स्थानिक प्रवासी, नागरिक आणि खास पर्यटनासाठी आलेले लोक अंबाझरी तलावातील विहंगम दृष्याचा नजारा पाहू शकतील. येथील विवेकानंद स्मारकाचे दर्शन घेऊ शकतील.
अंबाझरी मेट्रो स्टेशनवर फूड प्लाजा, मनोरंजनाचे साधन, वाय-फाय कनेक्टिव्हीटीसह इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.
अंबाझरी तलाव लागून असल्याने या मेट्रो स्टेशनला ‘अ‍ॅक्वा थीमवर बनवण्यात येणार आहे. याअंतर्गत स्टेशनचे छत, बाहेरच्या भिंतींसाठी जल रंगाचा वापर करण्यात येईल. या स्टेशनच्या डिझाईनचे काम अजूनही सुरू आहे. स्टेशन बांधकामाचे कंत्राट आयटीडी सीमेंटेशन कंपनीला देण्यात आले आहे.

क्रेझी कॅसलला लागून असलेली जमीन मागितली
दीक्षित यांनी सांगितले की, धरमपेठ कॉलेज मेट्रो स्टेशनचे बांधकाम सुरू झाले असले तरी ते रस्त्याच्या एकाच बाजूने सुरू आहे. दुसऱ्या बाजूच्या क्रेझी कॅसलला लागून असलेली शासकीय जमीन स्टेशनच्या बांधकामासाठी आवश्यक आहे. यासाठी महामेट्रोतर्फे नागपूर सुधार प्रन्यासला ही जागा मागण्यात आली आहे. ही जमीन मिळाल्यावर येथील स्टेशनचे काम आणखी गतीने करता येईल.

Web Title: Ambazari lake in metro gallery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.