अंबाझरी तलावाला मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:44 AM2018-07-21T00:44:51+5:302018-07-21T00:46:38+5:30
अंबाझरी येथील राखीव जंगलात बायो डायर्व्हसिटी पार्कचे काम सुरू आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, सिव्हर ट्रीटमेंट प्लान्ट, वृक्ष लागवड व संगोपन, पशु-पक्षी, औषधी, वनस्पती उद्याने व नर्सरी आदीची विकासकामे सुरू असून भविष्यात अंबाझरी तलावाला शुद्ध पाणी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी येथील राखीव जंगलात बायो डायर्व्हसिटी पार्कचे काम सुरू आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, सिव्हर ट्रीटमेंट प्लान्ट, वृक्ष लागवड व संगोपन, पशु-पक्षी, औषधी, वनस्पती उद्याने व नर्सरी आदीची विकासकामे सुरू असून भविष्यात अंबाझरी तलावाला शुद्ध पाणी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेसी यांनी सांगितले.
अंबाझरीच्या राखीव जंगलातील बायो डायर्व्हसिटी पार्कमधील विकास कामांचा आढावा प्रवीण परदेसी यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, वन विभागाचे मुख्य सचिव विकास खरगे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य वन संरक्षक गौर, डी. सी. एफ. मल्लिकार्जुन, वन परिक्षेत्र अधिकारी निनावे, नागपूर सुधार प्रन्यासचे अभियंता खान उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रवीण परदेसी यांनी प्रत्यक्षात वॉकिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅकची पाहणी केली. तसेच येथे तयार होणाऱ्या सिव्हर ट्रिटमेंट प्लॉन्टची पाहणी केली. हे प्लान्ट सहा महिन्याच्या आत तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाºयांना दिले. महिनाभरात अंबाझरीच्या राखीव जंगलात चितळ सोडण्यात येणार आहे. तसेच सहा महिन्यात हे जंगल पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून नागरिक वॉकिंग, सायकलिंग व प्रदूषणमुक्त पर्यावरणाचा आनंद घेऊ शकणार आहेत.