अंबाझरी स्टेशन ‘डचशैली’चे बनणार

By admin | Published: May 24, 2017 02:38 AM2017-05-24T02:38:03+5:302017-05-24T02:38:03+5:30

पूर्व-पश्चिम मार्गावरील मेट्रो रेल्वेचे अंबाझरी येथील स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘डचशैली’चे राहणार आहे.

Ambazari station will be made of Dutch style | अंबाझरी स्टेशन ‘डचशैली’चे बनणार

अंबाझरी स्टेशन ‘डचशैली’चे बनणार

Next

मेट्रो रेल्वे : युरोपियन धर्तीवर ‘वॉक-वे’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व-पश्चिम मार्गावरील मेट्रो रेल्वेचे अंबाझरी येथील स्टेशन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘डचशैली’चे राहणार आहे.
मेट्रोचे प्रत्येक स्टेशन आकर्षणाचे केंद्र होण्यासोबतच बहुपयोगी बनविण्याच्या दिशेने प्रयत्न केल्या जात आहे. स्मार्ट सिटी राज्य सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. मेट्रोचे प्रत्येक स्टेशन ड्रीम प्रोजेक्टला मूर्तरूप प्रदान करणारे राहील. अंबाझरी आणि सुभाषनगरचे मेट्रो स्टेशन हॉलंडची राजधानी अ‍ॅम्स्टर्डमच्या धर्तीवर डचशैलीला साकारणार आहे. अंबाझरी तलाव आणि उद्यान सहा दशकानंतर विदेशी रूप घेत आहे. विवेकानंद स्मारक नागपुरातील नागरिकांकरिता आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पामध्ये अंबाझरी तलाव आणि भौगोलिक क्षेत्राच्या उपयोगितेला विशेष लक्ष देऊन मेट्रो प्रशासनाने डिझाईनला अंतिम स्वरूप दिले आहे ते या दोन स्थानकांना जोडणार आहे.
आकर्षक राहणार ‘वॉक-वे’
सुभाषनगर ते अंबाझरी स्थानकापर्यंत ‘वॉक वे’ बनविण्यात येत आहे. यांची लांबी किमान एक कि़मी. राहील. ‘वॉक वे’वर मेट्रो ट्रेनचे संचालन राहील. अंबाझरी तलावासमोर मेट्रो स्थानकांना जोडणारा ‘वॉक वे’ शहरातील नागरिकांच्या उपयोगिताला लक्षात घेऊन बनविण्यात येत आहे. ‘वॉक-वे’मध्ये सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात येणार आहे. या सोबतच सुरक्षा कर्मचारी आणि खानपान सुविधा राहील. खऱ्या अर्थाने ‘वॉक-वे’ला अ‍ॅम्स्टर्डम शैलीत बनविल्या जात आहे. युरोपियनसारखा ‘वॉक-वे’ शहराची शान राहील. अ‍ॅम्स्टर्डममध्ये रेल्वे मार्गासोबतच रस्ते मार्ग आणि जलमार्ग उपलब्ध आहे. अंबाझरी तलावाजवळ निर्माणाधीन दोन स्थानकांना विश्वस्तरीय बनविण्याच्या दिशेने स्मार्ट सिटीमध्ये योगदान आहे. अंबाझरी तलावात ‘सी-प्लेन’चे नियोजनदेखील आहे. अंबाझरी येथील मेट्रो स्थानक शहरातील नागरिकांना नक्कीच आनंद देणार आहे. ‘ग्रीन मेट्रो’चे दृश्य या परिसरात जास्त प्रमाणात नागरिकांना दिसणार आहे. उपराजधानीचा गौरवशाली इतिहास आहे. बदलत्या काळात सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध करण्याकरिता ‘महा-मेट्रो’तर्फे प्रयत्न करण्यात येत असून शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात येत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या निर्देशानुसार मेट्रोचे कार्य शहराच्या चारही बाजूने जलद गतीने आणि स्टेशनचे बांधकाम वेगात सुरू आहे.

 

Web Title: Ambazari station will be made of Dutch style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.