आंबेडकर जयंती घरीच, संविधानाचे करणार वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 07:30 PM2020-04-13T19:30:50+5:302020-04-13T19:32:30+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुठलेही जाहीर कार्यक्रम करणार नाही, मिरवणुका काढणार नाही, इतकेच नव्हे तर आपापल्या घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करणार, असा संकल्प विविध क्षेत्रातील बौद्ध- आंबेडकरी संघटनांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करणे हीच आज खरी गरज आहे. ही गरज ओळखून गर्दी टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुठलेही जाहीर कार्यक्रम करणार नाही, मिरवणुका काढणार नाही, इतकेच नव्हे तर आपापल्या घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करणार, असा संकल्प विविध क्षेत्रातील बौद्ध- आंबेडकरी संघटनांनी केला असून नागरिकांनाही घराबाहेर पडू नका. आपापल्या घरी राहूनच भीमजयंती साजरी करा, असे आवाहनही केले आहे.
संविधान परिवार
आपण सर्वजण संविधानावर प्रेम करणारे, संविधानाला प्राण मानणारे आहोत. सध्या देशावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे, तेव्हा याची जाण ठेवून आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते, बुद्धविहार कमिटी, पंचशील झेंडा कमिटी, जयंती मंडळ, कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना, इतर सर्वांनीच आपापल्या घरात राहूनच भीमजयंती साजरी करावी, असे आवाहन संविधान परिवारचे प्रा. राहुल मून, नरेश गायकवाड, अॅड. सुरेश घाटे, सुरेश तेलंग, जितेंद्र जिभे. चंद्रमणी उके, सुधाकर टवळे, सेवक मून, अजय गुरभेले, दयाराम गावंडे, सुनील इलमकर, आशालता मून, माला वासनिक, नलिनी श्रीरामे, जयश्री मून, अनिता मेश्राम, प्रभाताई वांद्रे, कांचन जांभुळकर, सुजाता गायकवाड, प्रा. प्रियांका मून आदींनी केले आहे.
रिपब्लिकन सेना
कोरोनाच्या या लढाईत आपण सर्व शासनासोबत आहोत, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच कुटुंबासह साजरी करा, कुणीही बाहेर पडू नका, गर्दी करू नका, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांनी केले आहे.
रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणईही घराबाहेर पडू नका, शासनाच्या निर्देशांचे पालन करा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करा, असे आवाहन रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष अशोक कोल्हटकर यांनी केले आहे.
माजी मिलिंदीयन-नागसेनवन विद्यार्थी मित्रमंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांनी आपापल्या घरीच साजरी करावी, असे आवाहन माजी मिलिंदीयन-नागसेनवन विद्यार्थी मित्रमंडळाचे डॉ. तारेश शेंडे, अॅड. व्ही.पी. बोरकर, करुणा भगत, उद्धव वासनिक, पी.टी. खोब्रागडे, बी.बी. बेंदले, मधुकर मेश्राम, अॅड. गजभिये, वसंत रामटेके, भीमराव गोंडाणे, एम.एम. वाकोडे यांनी केले आहे.