दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी

By admin | Published: April 10, 2017 02:37 AM2017-04-10T02:37:54+5:302017-04-10T02:37:54+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे स्मारकवर रोषणाई केली जात आहे.

Ambedkar Jayanti's birth anniversary | दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी

दीक्षाभूमीवर आंबेडकर जयंतीची जय्यत तयारी

Next

स्मारकावर रोषणाई :
पंचशील ध्वजाने उजळणार परिसर

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे स्मारकवर रोषणाई केली जात आहे. दीक्षाभूमीच्या चारही बाजूंनी पंचशील ध्वज लावले जात आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त नागपुरात सर्वत्र जोरात तयारी सुरू आहे. वेगवेगळ्या संघटनांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. कस्तूरचंद पार्कवर १४ व १५ एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहे. सकाळी बाईक रॅली काढण्यात येणार आहे. यासोबतच शहरातील विविध भागांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे दीक्षाभूमी हीच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर गर्दी करतात. यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर उन तापत असल्याने स्मारक समितीच्यावतीने मागील काही वर्षांपासून मुख्य गेट ते पुतळा परिसरापर्यंत पेंडाल टाकला जातो. (प्रतिनिधी)

पंतप्रधानांच्या भेटीची उत्सुकता

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा १४ एप्रिल रोजी दीक्षाभूमीला भेट देणार आहे. त्यांच्या या भेटीचीही स्मारक समितीसोबतच आंबेडकरी अनुयायांनाही उत्सुकता आहे.

Web Title: Ambedkar Jayanti's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.