हिवाळी अधिवेशन २०२२; भाजपकडून आंबेडकरी जनतेचा अपमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 11:41 AM2022-12-20T11:41:19+5:302022-12-20T11:47:45+5:30

Nagpur news Maharashra Winter Session 2022 सत्ताधारी घाबरले असल्यामुळे विधानभवानांच्या पायऱ्यावर आंदोलन करावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला.

Ambedkari is an insult to the people by the BJP | हिवाळी अधिवेशन २०२२; भाजपकडून आंबेडकरी जनतेचा अपमान

हिवाळी अधिवेशन २०२२; भाजपकडून आंबेडकरी जनतेचा अपमान

Next

नागपूरः अंबाझरी उद्यानाची ४३ एकर जागा हडपून भाजप शासित महानगर पालिकेने खासगी लोकांना देऊन मोठा घोटाळा केला आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. सत्ताधारी घाबरले असल्यामुळे विधानभवानांच्या पायऱ्यावर आंदोलन करावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला.

सहा महिन्यापासून हे सरकार विकासाचे एकही काम करीत नसून भूखंड हडपण्याचे काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृत भवन पाडून त्या ठिकाणी अॅम्युझमेंट पार्क तयार करीत आहे.  आंबेडकरी जनतेचा भाजपने अपमान केला आहे. संत आणि महापुरुषांचा अपमान करणारे हे सरकार भ्रष्टाचारी असून जनता त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Ambedkari is an insult to the people by the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.