आंबेडकरी संघटनांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:10 AM2021-02-21T04:10:33+5:302021-02-21T04:10:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नागपुरातील आंबेडकरी संघटनांनीही आपला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला नागपुरातील आंबेडकरी संघटनांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यवतमाळ येथे आयोजित किसान महापंचायतमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय किसान युनियनच्या नेत्यांचे शनिवारी या संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. त्यांचे स्वागत केले व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला.
यवतमाळ येथे किसान महापंचायतीसाठी दिल्लीतील नेते आज नागपुरात पोहोचले. समता सैनिक दल व रिपब्लिकन आघाडीतर्फे बुटीबोरी येथे या नेत्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये रिपबिल्कन आघाडीचे संजय पाटील, घनश्याम फुसे, दिनेश अंडरसहारे, संजय जीवने, सचिन गजभिये, सुनील जवादे, विश्वास पाटील, शेषराव गणवीर, चरण पाटील, इशरत आरा, नर्गीस कुरेशी, शिरीष धनद्रव्ये, दीपक जवादे, चरणजीत जनबंधू, संजीवन वालदे, निखिल कांबळे, उमरखान, आवळे यांनी प्रत्येक्ष भेट घेऊन या नेत्यांचे स्वगत केले. यासोबतच समता सैनिक दलातर्फे केंद्रीय संघटक सुनील सारीपुत्त यांचा समावेश होता.