आंबेडकरी नाट्यचळवळीला शासकीय अनुदान मिळावे :  इ.झेड. खोब्रागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:18 PM2020-02-24T23:18:25+5:302020-02-24T23:20:05+5:30

नाटक हे प्रबोधनाचे माध्यम असून, आंबेडकरी नाट्यचळवळीला उभारी देण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केली.

Ambedkarti theater will receive government subsidy: EZ. Khobragade | आंबेडकरी नाट्यचळवळीला शासकीय अनुदान मिळावे :  इ.झेड. खोब्रागडे

आंबेडकरी नाट्यचळवळीला शासकीय अनुदान मिळावे :  इ.झेड. खोब्रागडे

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेडकरी नाट्य महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाटक हे प्रबोधनाचे माध्यम असून, आंबेडकरी नाट्यचळवळीला उभारी देण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची मागणी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केली.
सम्यक थिएटर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तसेच डॉ. आंबेडकर फाऊंडेशन दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्राच्या सिव्हील लाईन्स येथील सभागृहात आंबेडकरी नाट्य महोत्सवाचे आयोजन सिव्हील लाईन्य येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खोब्रागडे बोलत होते. व्यासपीठावर सूचना प्रसारण मंत्रालयाच्या गीत व नाटक प्रभागाचे माजी संचालक डॉ. निलकांत कुलसंगे, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, ज्येष्ठ कवी आणि नाटककार इ. मो. नारनवरे उपस्थित होते.
संयोजन समितीने नाट्य महोत्सवासाठी अनुदान मिळावे असा प्रस्ताव शासनाला पाठवावा आणि समाज कल्याण खात्यामार्फत हे अनुदान घ्यावे. यामुळे नाट्य चळवळीला अधिक उर्जितावस्था येईल आणि आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ वाढेल, असे खोब्रागडे यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अशोक जांभुळकर यांनी तर आभार किरण काशीनाथ यांनी मानले.

Web Title: Ambedkarti theater will receive government subsidy: EZ. Khobragade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.