नागपूर ते जबलपूर नवीन लाईनवर 'ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 11:36 AM2022-01-27T11:36:59+5:302022-01-27T11:49:13+5:30

नागपूर ते जबलपूरचे अंतर ५७५ किलोमीटर आहे. आता नागपूर-छिंदवाडानंतर नैनपूर-मंडला फोर्टदरम्यान तयार होत असलेल्या ट्रॅकमुळे जबलपूरचे अंतर ३७० किमी होईल.

Ambulance Express to run on new line from Nagpur to Jabalpur | नागपूर ते जबलपूर नवीन लाईनवर 'ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस'

नागपूर ते जबलपूर नवीन लाईनवर 'ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस'

Next
ठळक मुद्देचौथी लाईन होणार तयार

वसीम कुरैशी

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या अंतर्गत छिंदवाडा-नैनपूर- मंडला फोर्टदरम्यान रेल्वेचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे. या लाईनवर चौराई ते सिवनीदरम्यान काही भागात ट्रॅक बसविण्याचे काम शिल्लक आहे. त्याचबरोबर नागपूर ते छिंदवाडा-नैनपूर होत जबलपूरसाठी चवथ्या रेल्वे मार्गावरील वाहतूक देखील याच वर्षी सुरू होणार आहे. नागपूर ते जबलपूर होत इटारसी जाणारी ट्रेन ॲम्ब्युलन्स एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाते. छिंदवाडा होत जाणार असल्याने या रस्त्याचे अंतर कमी होईल व रुग्णांना देखील सुविधा होईल.

छिंदवाडा-नैनपूर- मंडला फोर्ड हा प्रकल्प २०२१ मध्ये पूर्ण होणार होता. मिळालेल्या माहितीनुसार चौराई ते भोमा दरम्यान सीएसआर इन्स्पेक्शन लवकरच पूर्ण होईल. धुमा ते सिवनीदरम्यान २२ किलोमीटरच्या टप्प्यात काही भागांत ट्रॅक बसविण्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल.

- यावर्षी सुरू होईल ट्रेन

चौराई ते भोमादरम्यान इलेक्ट्रीफिकेशनचे काम झाले आहे. लवकरच उर्वरित काम पूर्ण होईल. या रस्त्यावर नागपूर ते सिवनीदरम्यान रेल्वे प्रवास करण्याची सोयदेखील उपलब्ध होईल. जबलपूरसाठी नागपूरहून ब्रॉडगेज रुट उपलब्ध होईल. याचवर्षी नागपूर ते छिंदवाडा होत सिवनी-नैनपूर होत जबलपूरसाठी ट्रेन सुरू होईल.

मनिंदर उप्पल, मंडळ रेल्वे प्रबंधक, द.पू.म.रेल

- २०० किमी चे अंतर होईल कमी

नागपूर ते जबलपूरचे अंतर ५७५ किलोमीटर आहे. आता नागपूर-छिंदवाडानंतर नैनपूर-मंडला फोर्टदरम्यान तयार होत असलेल्या ट्रॅकमुळे जबलपूरचे अंतर ३७० किमी होईल. ट्रेन सुरू झाल्यानंतर नागपूर ते छिंदवाडा होत जबलपूरसाठी सुपरफास्ट ट्रेन चालविल्यास हे अंतर केवळ ६ तासांतच पूर्ण होईल तर नागपूर-जबलपूर होत इटारसीला ९ तासांत पोहोचता येईल.

- सध्या जबलपूरसाठी उपलब्ध असलेले मार्ग

- नागपूर-जबलपूर होत इटारसी

- नागपूर- तुमसर- तिरोडी - कटंगी - नैनपूर होत जबलपूर (थेट ट्रेन उपलब्ध नाही)

- नागपूर-गोंदिया-बालाघाट-नैनपूर-जबलपूर (थेट ट्रेन उपलब्ध नहीं)

Web Title: Ambulance Express to run on new line from Nagpur to Jabalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे