रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:15+5:302021-07-05T04:07:15+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : नरखेड लाेकनिर्माण कंत्राटदार संघटना, विभाग मिशन फाईट अगेन्स्ट काेविड-१९ अंतर्गत बांधकाम कंत्राटदार संघटनेच्या वतीने ...

Ambulance service for patients started | रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : नरखेड लाेकनिर्माण कंत्राटदार संघटना, विभाग मिशन फाईट अगेन्स्ट काेविड-१९ अंतर्गत बांधकाम कंत्राटदार संघटनेच्या वतीने काटाेल व नरखेड तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका सुविधा सुरू करण्यात आली. साेबतच संघटनेने स्वखर्चातून जम्बाे ऑक्सिजन सिलिंडर व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

नागपूर विभागीय लाेकनिर्माण अधिकारी सी. ई. सुशीर, एस. ई. गाडीगाेणे, अतिरिक्त सीईओ फुटाणे, ई. ई. गुप्ता, गणाेरकर, व्हीडीआयसीचे दळवी, डी. वाय. डाेंगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात काेराेना संक्रमणामुळे मृत्यू झालेले लाेकनिर्माण विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते काटाेल व नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका, जम्बाे ऑक्सिजन सिलिंडर प्रदान करण्यात आले. कंत्राटदार संघटनेच्या या कार्याबद्दल लाेकनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली. बापूसाहेब चरडे यांनी प्रास्ताविकात लाेकनिर्माण विभागातील कंत्राटदारांकडून कठीण काळात मिळालेल्या मदतीबाबत माहिती दिली. त्यांच्या भरीव सहकार्याबद्दल कंत्राटदारांचे काैतुक केले. संजय भक्ते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Ambulance service for patients started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.