पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमेयचे प्रशंसनीय प्रयत्न
By admin | Published: December 19, 2014 12:46 AM2014-12-19T00:46:05+5:302014-12-19T00:46:05+5:30
भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने विद्ध्वंस केला. लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील आपत्तीग्रस्तांना मदत व्हावी,
छायाचित्रांतून मांडले काश्मीरचे वास्तव : लंडनमधून मिळविली ६० हजाराची मदत
नागपूर : भारताचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचा सप्टेंबरमध्ये आलेल्या महापुराने विद्ध्वंस केला. लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील आपत्तीग्रस्तांना मदत व्हावी, म्हणून अमेय कुळकर्णी नावाच्या ९ वर्षीय बालकाने काश्मीरची चित्रे काढून, तेथील वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहचविली. त्याच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याने कॅ मेराबद्ध केलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत लावण्यात आले आहे.
इम्प्रेशन आॅफ इंडिया नावाने लावण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला छायाचित्रकार शेखर सोनी, शेफ विष्णू मनोहर, अमयचे आजी आजोबा मोहन व दुहिता कुळकर्णी, वडील अधिष कुलकर्णी उपस्थित होते.
या प्रदर्शनात लावलेल्या छायाचित्रांची तो विक्री करून काश्मिरातील पूरग्रस्तांना मदत करणार आहे. मूळचा नागपूरचा असलेला अमेय सध्या आपल्या पालकासोबत लंडनला राहतो. गेल्या उन्हाळ्यात तो जम्मू-काश्मीरच्या सफरीवर गेला होता. त्याने तिथले भरपूर फोटो काढले. त्या छायाचित्रांचे प्रेझेंटेशन बनवून लंडनमधील आपल्या वर्गमित्रांना दाखविले. त्यांच्याकडून त्याने ६०,००० रुपयांची मदत मिळविली होती.
अमेयच्या कृतीचे कौतुक व्हावे व मदतनिधीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने अमेयच्या आजी-आजोबांनी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन शुक्रवारी १९ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ८.३० खुले राहणार आहे. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून जमा होणारा सर्व निधी प्रधानमंत्री आपत्ती निवारण कोषात दान केला जाईल.(प्रतिनिधी)