आमझरे यांनी स्वीकारला ग्रामीण मंडळाचा पदभार
By Admin | Published: May 4, 2017 02:07 AM2017-05-04T02:07:36+5:302017-05-04T02:07:36+5:30
महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून नारायण आमझरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
अधीक्षक अभियंता म्हणून रुजू
नागपूर : महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून नारायण आमझरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. राजेंद्र पवार यांची पुणे येथे बदली झाल्याने त्या जागी थेट पदोन्नतीने आमझरे यांची नियुक्ती करण्यात आली. नारायण आमझरे १९८९ साली महाराष्ट्र राज्य वीज मंडळात कनिष्ठ अभियंता पदावर रुजू झाले होते. तेव्हापासून त्यांनी विविध विभागात सेवा दिली आहे.
मार्च २००४ ते सप्टेंबर २००७ या काळात मुंबई येथील मुख्यालयात सहायक अभियंता व नंतर सप्टेंबर २००७ ते एप्रिल २०१७ पर्यंत याच मुख्यालयात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते. त्यांची थेट पदोन्नतीतून नागपूर ग्रामीणला अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली.
पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतानाच नागपूर जिल्ह्यातील वीज सेवांच्या आधुनिकतेवर आपला भर राहणार असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. मूळचे वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव येथील निवासी असलेले आमझरे यांनी आपला अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पूर्ण केला होता.(प्रतिनिधी)