उपराजधानीतील लाखात तीन मुलांमध्ये ‘टाईप वन’ मधुमेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:41 AM2019-06-27T10:41:48+5:302019-06-27T10:42:12+5:30

लहान मुलांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. पालकही त्यात भर घालत आहेत. लहान मुलांच्या जेवणातील भात, भाजी, पोळी हरवली असून पिझ्झा, बर्गर, जंक फूड आवडता आहार बनला. याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत.

Among the three children in Lakh, 'type one' diabetes | उपराजधानीतील लाखात तीन मुलांमध्ये ‘टाईप वन’ मधुमेह

उपराजधानीतील लाखात तीन मुलांमध्ये ‘टाईप वन’ मधुमेह

googlenewsNext
ठळक मुद्देपिझ्झा, बर्गर, जंक फूडचे दुष्परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लहान मुलांच्या खाद्यपदार्थांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. पालकही त्यात भर घालत आहेत. लहान मुलांच्या जेवणातील भात, भाजी, पोळी हरवली असून पिझ्झा, बर्गर, जंक फूड आवडता आहार बनला. याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. लहान वयातच मुलांमधील लठ्ठपणा वाढला आहे. भारतात एक लाख मुलांमागे तीन नवीन मुले मधुमेहाच्या (टाईप वन) विळख्यात सापडत आहेत, अशी माहिती डायबिटीज केअर फाऊंंडेशन आॅफ इंडिया तसेच डायबिटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली.
बदलत्या जीवनशैलीमुळे किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाचा टाईप-१ मोठ्या प्रमाणात आढळतो. मुलांना दिवसातून चारवेळा इन्सूलीनचा डोस घ्यावा लागतो, ही बाब चिंताजनक आहे. मात्र, योग्य जीवनशैली आणि आहाराचा समन्वय साधल्यास सामान्य जीवन जगता येते. त्यांच्यावरील उपचारासाठी तसेच सामान्य जीवन जगण्यासाठी आवश्यक माहिती या मुलांना तसेच त्यांच्या पालकांना होणे गरजेचे आहे. यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. सेंटरमध्ये हजारावर मुलांची नोंदणी झाली. पत्रकार परिषदेला डॉ. सरिता उगेमुगे, आहारतज्ज्ञ कविता गुप्ता, डॉ. सचिन गथे उपस्थित होते.

Web Title: Among the three children in Lakh, 'type one' diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.