रक्कम घेतली, भूखंडाचे विक्रीपत्र करून दिलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:14+5:302021-08-29T04:12:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - साैदा केल्यानंतर सत्तर टक्के रक्कम घेऊन ९ वर्षे होऊनही आरोपींनी भूखंडाचे रीतसर विक्रीपत्र करून ...

The amount was taken, the land was not sold | रक्कम घेतली, भूखंडाचे विक्रीपत्र करून दिलेच नाही

रक्कम घेतली, भूखंडाचे विक्रीपत्र करून दिलेच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - साैदा केल्यानंतर सत्तर टक्के रक्कम घेऊन ९ वर्षे होऊनही आरोपींनी भूखंडाचे रीतसर विक्रीपत्र करून दिले नाही. त्यामुळे कपिलनगर पोलिसांनी २१ आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

सुरेश फुलचंद विश्वकर्मा (वय ४९) असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. ते कपिलनगरात राहतात. त्यांनी १८ जून २०१२ ला सर्वोदय सहकारी संस्था, मर्यादित माैजा नारी, रमाईनगरच्या पदाधिकाऱ्यांकडून ४.५० लाखात एक भूखंड विकत घेण्याचा साैदा केला होता. त्यापोटी त्यांना ३.५० लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम विक्रीपत्र करून देतेवेळी देण्याचे ठरले होते. आता त्याला ९ वर्षे झाली. परंतू आरोपींनी विश्वकर्मा यांना विक्रीपत्र करून दिले नाही. आरोपी सारखी टाळाटाळ करत असल्यामुळे विश्वकर्मा यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चाैकशीअंती शुक्रवारी खालील आरोपींविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

---

आरोपींची नावे

अंजनाबाई रूपचंद मोटघरे, विजय रूपचंद मोटघरे, सविता राजेश मोटघरे, अभिषेक राजेश मोटघरे, शिवानी राजेश मोटघरे, जोस्त्ना येमराज

वासनिक, स्मिता राजेश तांबे, सुषमा जयकुमार मेश्राम, अलका मनोहर वंजारी, (सर्व रा. हरीदास नगर, लष्करीबाग), जितू लीलाधर मोटघरे, महेद्र लीलाधर मोटघरे, मीना प्रकाश चव्हाण (रा. कबीर नगर ), साधना निलकंठ मोटघरे, शुभम निलकंठ मोटघरे, सोनम अजय नितनवरे, मीनल निलकठ मोटघरे (सर्व रा. वैशालीनगर), शिला गणेश मोटघरे, शक्ती गणेश मोटघरे, स्वप्नील गणेश मोटघरे (रा. संत्रा मार्केट रोड, कुंभारपुरा, बजेरीया), आशा ईश्वर मोटघरे आणि अंकीता ईश्वर मोटघरे (रा. हिंगणा मार्ग), अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

---

Web Title: The amount was taken, the land was not sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.