अमृत योजनेत मिळणार ३२.८८ कोटी

By admin | Published: February 24, 2016 03:10 AM2016-02-24T03:10:16+5:302016-02-24T03:10:16+5:30

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेला केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत ३२.८८ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.

Amrit scheme will get 32.88 crores | अमृत योजनेत मिळणार ३२.८८ कोटी

अमृत योजनेत मिळणार ३२.८८ कोटी

Next

केंद्र सरकारचा निर्णय : मनपाच्या प्रकल्पांना गती मिळणार
नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेला केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत ३२.८८ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. यामुळे रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार आहे.
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ३१ मार्च २०१४ पर्यंत ५० टक्क्यांहून अधिक काम झालेल्या प्रकल्पासाठी उर्वरित निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा पुनर्वापर प्रकल्प, पेंच टप्पा-४ च्या भाग-२ (गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याची पाईपलाईन)यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे नागपूर महापालिकेला केंद्राकडून २३.४९ कोटी तर राज्य सरकारकडून ९.३९ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे.
जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत उर्वरित निधी प्राप्त व्हावा यासाठी महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी संबंधित मंत्रालयातील अधिकाऱ्यांची अनेकदा मुंबई व दिल्ली येथे भेट घेऊ न चर्चा केली, तसेच याचा पाठपुरावा केला होता. (प्रतिनिधी )

शहर विकासाला मदत
केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होणार असल्याने रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. यामुळे शहर विकासाला मदत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे हा निधी प्राप्त झाला आहे.
- प्रवीण दटके, महापौर

Web Title: Amrit scheme will get 32.88 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.