विविध संघटनांतर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:18+5:302021-08-18T04:11:18+5:30
महामेट्रोच्या मुख्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कठीण परिस्थितीचा सामना ...
महामेट्रोच्या मुख्यालयात आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कठीण परिस्थितीचा सामना करीत ध्येय प्राप्त करण्याचा संकल्प करण्याचा मंत्र दीक्षित यांनी दिला. आमचे कामच आमची ओळख आहे. त्यांनी तिरंगा फडकावून परेडची सलामी घेतली. कार्यकारी संचालक अनिल कोकाटे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणा केली. महामेट्रोच्या विविध आकर्षक स्थानकांवर रोषणाई करण्यात आली.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ()
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (बीएमए) अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बीएमएचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, माजी अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव शशिकांत कोठारकर, सदस्य शिराज डुंगाजी, फायर अधिकारी महाडिक, संजय नागुलवार, किशोर मालविया, हितेश अग्रवाल, जीवन घिमे, पुनित महाजन, रवी सिंह, विजय अग्रवाल, युवराज व्यास, अल्केश सराफ, जॉसेफ थॉमस, पंकज भालेराव, रुचिर गुप्ता, रवी मुरले, राजेश रेवतकर, प्रशांत मेश्राम, पेटकर, इमरान, श्रुती गोयल व अन्य सदस्य उपस्थित होते.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ()
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सिव्हील लाईन्स येथील प्रांगणात स्वातंत्र्यदिन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी सचिव रामअवतार तोतला, माजी अध्यक्ष हेमंत गांधी, उपाध्यक्ष अर्जुनदास आहुजा, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, सहसचिव उमेश पटेल, राजवंतपाल सिंग तुली, अभय अग्रवाल, अग्रवाल, महेश कुकडेजा, मनोज लटुरिया, मोहन चोईथानी, रामनिवास गर्ग, सलीम अजानी, संजय पचेरीवाला, संदीप अग्रवाल, आनंद मेहाडिया, विजय चांडक, देवेंद्र तिवारी, राकेश आहुजा, रमेश लालवानी, यश वर्मा, आशिष अग्रवाल उपस्थित होते.
एमआयडीसी हिंगणा इंडस्ट्रीज असोसिएशन ()
एमआयडीसी हिंगणा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या एमआयडीसी येथील कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्ष चंद्रशेखर शेगावकर यांच्या हस्ते झेंडा फडकविण्यात आला. याप्रसंगी माजी अध्यक्ष सी. एम. रणधीर, उपाध्यक्ष एस. एम. पटवर्धन, सचिव सचिन जैन, कोषाध्यक्ष मुरली मोहन पंटुला, एन. एन. गुप्ता, डॉ. रवींद्र गांधी, पी. मोहन, डॉ. रवींद्र अहीर आणि अन्य उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.