अमृतसर, पुणे एसी स्पेशल रेल्वेगाड्या
By admin | Published: January 3, 2016 03:31 AM2016-01-03T03:31:13+5:302016-01-03T03:31:13+5:30
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे आणि नागपूर-अमृतसर दरम्यान प्रत्येकी आठ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची सुविधा : अतिरिक्त गर्दी पाहून निर्णय
नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-पुणे आणि नागपूर-अमृतसर दरम्यान प्रत्येकी आठ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ०२१२४ नागपूर-पुणे वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी मंगळवारी (५, १२, १९, २६ जानेवारी) नागपूरवरून सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी वर्धाला रात्री ८.५०, धामणगाव ९.३५, बडनेरा १०.३७, अकोला येथे रात्री ११.४० वाजता आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२१२३ पुणे-नागपूर एसी स्पेशल रेल्वेगाडी प्रत्येक बुधवारी (६, १३, २० आणि २७ जानेवारी) पुण्यावरून दुपारी ३.१५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी अकोला येथे रात्री १२.५०, बडनेरा २.२५, धामणगाव ३.०२, वर्धा ३.४० आणि नागपूरला पहाटे ५.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, दौंड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्यात १ एसी फर्स्ट, ४ एसी टु टायर, ९ एसी थ्री टायर असे एकूण १४ कोच राहतील. दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२१२५ नागपूर-अमृतसर ही गाडी प्रत्येक शनिवारी (९, १६, २३, ३० जानेवारीला) नागपूरवरून सायंकाळी ५.५० वाजता सुटेल.
ही गाडी अमृतसरला दुसऱ्या दिवशी रात्री ९.०५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२१२६ अमृतसर-नागपूर वातानुकूलित विशेष रेल्वेगाडी प्रत्येक सोमवारी (११, १८, २५ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला) अमृतसरवरून पहाटे ४.२० वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.२५ वाजता पोहोचेल.
दोन्ही गाड्यांना भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कॅन्ट, नवी दिल्ली, अंबाळा, लुधियाना, जालंधर येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात १ एसी फर्स्ट, ४ एसी टु टायर, ९ एसी थ्री टायर कोच आहेत. दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. (प्रतिनिधी)