स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नागपुरात जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:12 AM2021-08-17T04:12:40+5:302021-08-17T04:12:40+5:30
- कोरोना निर्बंधात सूज्ञतेने झाले ध्वजारोहण : विविध संघटनांनी क्रांतिकारकांचे केले स्मरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाचा ७५ ...
- कोरोना निर्बंधात सूज्ञतेने झाले ध्वजारोहण : विविध संघटनांनी क्रांतिकारकांचे केले स्मरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन सोहळा नागपुरात विविध संघटनांनी जल्लोषात साजरा केला. कोरोनाच्या सावटात आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करीत नागरिकांनी ध्वजारोहण केले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. कोरोना निर्बंधात शिथिलता असली तरी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीचे वहन करीत कुठल्याही हुल्लडबाजीला थारा दिला नाही. सूज्ञतेने नागरिकांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा केला.
भारत स्वाभिमान न्यास ()
भारत स्वाभिमान न्यास (ट्रस्ट), पतंजली योग समिती, युवा भारत, जिल्हा किसान योग समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहण प्रदीप काटेकर यांच्या हस्ते झाले. संचालन दीपक येवले यांनी केले. यावेळी पूर्वा गायधने हिने राष्ट्रगीत सादर केले. यावेळी माधुरी ठाकरे, शारदा वऱ्हाडे, मंगला बावनकर, जोशना इंगळे, भावना टेंभरे, दीपक जरगर, सुभाष निंबूळकर, सुभाष बोरोले उपस्थित होते.
कामगार कल्याण भवन ()
कामगार कल्याण भवन येथे आयोजित कार्यक्रमाला माजी उपमहापौर सतीश होले, ईएसआयसी इन्स्पेक्टर सुरेंद्र पांडे, ज्येष्ठ नागरिक विनय हजारे, सहा.कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, प्र.कामगार विकास अधिकारी प्रतिभा भाकरे उपस्थित होते.
विद्यासाधना काॅन्व्हेंट व ज्युनिअर काॅलेज ()
विद्यासाधना काॅन्व्हेंट व ज्युनिअर काॅलेज येथे आर्किटेक्ट सुबोध चिंचमलातपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप सरटकर, संचालक राजेश सरटकर, मुख्याध्यापिका सरिता शेंडे, प्रणाली, सरटकर, किशोरी सरटकर, विद्यासाधना काॅन्व्हेंट, हायस्कूल, ज्युनिअर काॅलेज व डीएमएलटी काॅलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यांनी नृत्य, गीत व विविध कला सादर केल्या. संचालन शालिनी तिजारे यांनी केले.
स्व. राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक समिती ()
स्व. राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष निर्मला बोरकर, कार्याध्यक्ष बाळकृष्ण चरडे, चंद्रकांत कुकवास, श्रीराम चरडे, विजय बोरकर, प्रवीण बोरकर, अर्चना सिडाम, अनिल बारापात्रे, गजानन बोकडे, रामचंद्र केळवदकर, दिलीप गहुकर, देवीदास बांते उपस्थित होते.
राही पब्लिक स्कूल ()
राही पब्लिक स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाला समीर डिग्रसे, केतन पारधी, आर्यन शिवहरे, मयुरी डायरे, विवेक राऊत, कुणाल पारधी, सुहानी दहिवले या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक विजय राऊत, संचालिका सुधा राऊत, नरेंशचंद्र वसू, गुरप्रीत कौर, सरिता भोयर, रणजी खेळाडू अमित सिंग उपस्थित होते.