जीवन नौकेच्या अमुच्या दीपस्तंभ भीम आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:04 AM2020-12-07T04:04:57+5:302020-12-07T04:04:57+5:30

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक सुरक्षेचे नियम पाळूनच अनुयायांनी दीक्षाभूमीवर हजेरी लावली होती. चेहऱ्यावर मास्क लावूनच ...

Amu's beacon of life is Bhim ... | जीवन नौकेच्या अमुच्या दीपस्तंभ भीम आहे...

जीवन नौकेच्या अमुच्या दीपस्तंभ भीम आहे...

googlenewsNext

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता सामाजिक सुरक्षेचे नियम पाळूनच अनुयायांनी दीक्षाभूमीवर हजेरी लावली होती. चेहऱ्यावर मास्क लावूनच आतमध्ये प्रवेश दिला जात होता आणि शारीरिक अंतर राहील याची काळजी घेतली जात होती. दीक्षाभूमीवर तशी व्यवस्थाही करण्यात आली होती. स्तुपामध्ये गर्दी होणार नाही, यासाठी एकेका व्यक्तीलाच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. नमन केल्यानंतर आलेल्या प्रत्येक कुटुंबाने दूर दूर राहून विसावा घेतला. हजारो लोक परिसरात होते, पण अंतर पाळून होते. काछीपुरा ते अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत मार्ग बंद ठेवण्यात आला होता. दुसरीकडे संविधान चौकातही अभिवादनासाठी लोकांनी हजेरी लावली. हा सिलसिला सायंकाळी उशिरापर्यंत चालला होता. मात्र संसर्गाचा धोका होणार नाही, याची काळजी घेतली जात होती.

अनेकांनी घरूनच ऑनलाईन अभिवादन करण्यावर भर दिला. विविध संस्था, संघटनांनी ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करून महामानवाला श्रद्धासुमन अर्पण केले.

Web Title: Amu's beacon of life is Bhim ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.