अॅमवे इंडिया बाल कुपोषणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:07 AM2021-04-10T04:07:26+5:302021-04-10T04:07:26+5:30
नागपूर : पोषण आणि कल्याण क्षेत्रातील देशातील आघाडीची एफएमसीजी डायरेक्ट सेलिंग कंपन्यांपैकी एक अॅमवे इंडियाने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करून ...
नागपूर : पोषण आणि कल्याण क्षेत्रातील देशातील आघाडीची एफएमसीजी डायरेक्ट सेलिंग कंपन्यांपैकी एक अॅमवे इंडियाने राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करून जागतिक आरोग्य दिवस साजरा केला. यादिनी मुलांच्या पोषण आहारावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला.
एनजीओ भागीदार एसआरएफ फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांनी सध्याचे आव्हान आणि पाच वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य सुधारणांच्या संधीवर चर्चा केली. चर्चेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्या ज्योतिका कालरा, महिला व बालविकास विभाग हरियाणाच्या सहसंचालिका राजबाला कटारिया, द कॉएलिशन फॉर फूड अॅण्ड न्यूट्रिशन सिक्युरिटीचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित रंजन, अॅमवे इंडिया एन्टरप्राईजेस प्रा.लि.,चे मुख्य विपणन अधिकारी अजय खन्ना, महाराजा सयाजीराव विद्यापीठातील खाद्य व पोषण विभागाचे प्रा. डॉ. सिरीमावो नायर, जिल्हा बाल आरोग्य अधिकारी बसंत कुमार दुबे आणि एसआरएफ फाऊंडेशनचे संचालक डॉ. वाय सुरेश रेड्डी उपस्थित होते.
अजय खन्ना म्हणाले, अॅमवे इंडिया लोकांना सर्वोत्तम जीवन जगण्यास मदत करण्याच्या ध्येयासह अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एक ठोस सामाजिक प्रभाव निर्मित करण्याचा प्रयत्न करते. भारत सरकारच्या राष्ट्रीय पोषण मिशनसोबत मिळून अॅमवेने जागतिक स्तरावर प्रशंसनीय अभियान ‘पॉवर ऑफ ५’ची सुरुवात केली आहे. त्याचा उद्देश लहानपणात कुपोषणाच्या मुद्द्यावर जागरुकता वाढविणे आणि मोठ्या प्रमाणावर माता आणि समाजात आवश्यक व्यवहारात बदल आणणे, हा आहे. (वा.प्र.)