कामावर गेलेल्या ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींने केली हत्या, हिंगण्यातील घटना

By योगेश पांडे | Published: June 14, 2024 04:22 PM2024-06-14T16:22:50+5:302024-06-14T16:23:00+5:30

दिनेश हरीदास नगराळे (५०, वडगांव गुजर, गुमगाव, हिंगणा) असे मृतकाचे नाव आहे...

An auto driver who went to work was killed by unknown persons, an incident in Nagpur | कामावर गेलेल्या ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींने केली हत्या, हिंगण्यातील घटना

कामावर गेलेल्या ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींने केली हत्या, हिंगण्यातील घटना

नागपूर : कामावर गेलेल्या एका ऑटोचालकाची अज्ञात व्यक्तींनी डोक्यावर प्रहार करत हत्या केली. ऑटोचालकाला मृतदेह त्याच्याच गावाच्या मार्गावर सापडला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

दिनेश हरीदास नगराळे (५०, वडगांव गुजर, गुमगाव, हिंगणा) असे मृतकाचे नाव आहे. ते टेंभरी बुटीबोरी येथे ऑटो चालविण्याचे काम करतात. दररोज ते दुचाकीने त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी जायचे व तेथे पार्क केलेला ऑटो घेऊन कामावर जायचे. १३ जून रोजी ते सकाळी साडेसात वाजता घरून निघाले. मात्र रात्री नऊ वाजेपर्यंतदेखील ते घरी न आल्याने त्यांच्या पत्नी व दोन मुलींनी शोधाशोध सुरू केली. त्यांचा फोनदेखील स्वीच ऑफ येत होता. सव्वा नऊ वाजता गावातीलच दोन जणांनी येऊन दिनेश हे समृद्धी महामार्गापासून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले असल्याचे सांगितले. कुटुंबीय तेथे पोहोचले असता त्यांच्या डोके, छातीतून रक्त निघत होते व दुचाकी रस्त्याच्या कडेला पडली होती. कुणीतरी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याचे दिसून येत होते. जवळच पाच फूटाचा बांबूदेखील पडला होता. दिनेश यांना एम्स मध्ये नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची पत्नी अलका यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
 

Web Title: An auto driver who went to work was killed by unknown persons, an incident in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.