सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 06:17 PM2022-06-13T18:17:19+5:302022-06-13T18:22:58+5:30

ती बाहेर येण्यापूर्वीच चाैकशी न करता सुरक्षारक्षकाने त्या स्वच्छतागृहाचे चॅनल गेट बंद करून कुलूप लावले. त्यामुळे ती महिला आत अडकली.

An elderly woman passenger got stuck in the toilet at the bus stand | सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात

सुरक्षारक्षकाने बंद केले चॅनल गेट, म्हातारी महिला प्रवासी अडकली बसस्थानकातील स्वच्छतागृहात

Next
ठळक मुद्देमाैदा शहरातील घटना

माैदा (नागपूर) : म्हातारी महिला प्रवासी रविवारी (दि. १२) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास माैदा शहरातील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी गेली. ती बाहेर येण्यापूर्वीच चाैकशी न करता सुरक्षारक्षकाने त्या स्वच्छतागृहाचे चॅनल गेट बंद करून कुलूप लावले. त्यामुळे ती महिला आत अडकली.

त्या महिलेचे नाव कळू शकले नाही. ती काही कामानिमित्त माैदा शहरात आली हाेती. गावाला परत जाण्यासाठी ती माैदा शहरातील बसस्थानकात बसून बसची प्रतीक्षा करीत हाेती. त्यातच ती लघुशंकेसाठी बसस्थानकातील स्वच्छतागृहात गेली. ती बाहेर येण्यापूर्वीच सुरक्षारक्षकाने स्वच्छतागृहाचे चॅनल गेट बंद करून त्याला कुलूप लावले. महिला स्वच्छतागृहाच्या बाहेर येताच गेट बंद केल्याचे तिच्या लक्षात आले. बाहेर येणे शक्य नसल्याने ती आत तेथेच बसून राहिली.

या प्रकाराची माहिती मिळताच रमेश कुंभलकर त्यांच्या सहकाऱ्यांसह बसस्थानकात पाेहाेचले. त्यांनी लगेच डेपाे मॅनेजरशी संपर्क साधला व या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्याने बसस्थानकात येऊन कुलूप उघडले व तिची मुक्तता केली. मात्र, ती किमान एक तास आत अडकून हाेती. स्वच्छतागृह आधीच बंद केले जात असल्याने महिलांची गैरसाेय हाेते. त्यामुळे ते रात्री १० वाजता बंद करावे, अशी मागणी रमेश कुंभलकर यांच्यासह प्रवाशांनी केली आहे.

Web Title: An elderly woman passenger got stuck in the toilet at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.