मनोरुग्ण महिलेचा जाळून घेतल्याने मृत्यू; नागपूरमधील घटना
By दयानंद पाईकराव | Updated: March 18, 2023 20:27 IST2023-03-18T20:27:09+5:302023-03-18T20:27:25+5:30
शोभा महादेव पिल्लारे (५१, बहादुरा फाटा, ब्रह्मदेवनगर, हुडकेश्वर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

मनोरुग्ण महिलेचा जाळून घेतल्याने मृत्यू; नागपूरमधील घटना
नागपूर : मनोरुग्ण महिलेने आपल्या राहत्या घरी जाळून घेतल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. शोभा महादेव पिल्लारे (५१, बहादुरा फाटा, ब्रह्मदेवनगर, हुडकेश्वर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या मानसिक रुग्ण होत्या. त्यांनी रविवारी १२ मार्चला दुपारी ३.३० वाजता आपल्या राहत्या घरी स्वत:ला जाळून घेतले.
घरातील व्यक्तींनी त्यांना उपचारासाठी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ४ मध्ये दाखल केले. तेथे उपचारादरम्यान १७ मार्चला दुपारी २.१५ वाजता त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून हुडकेश्वरचे उपनिरीक्षक राजु पवार यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.