ताडोबात फिरतेय दोन पिल्लांची जखमी वाघीण, वन अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 06:23 AM2022-11-28T06:23:10+5:302022-11-28T06:23:17+5:30

वनविभागाची पाळत : पांगडीभोवती वावर

An injured tigress with two cubs walking in the forest caught the attention of the forest officials | ताडोबात फिरतेय दोन पिल्लांची जखमी वाघीण, वन अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

ताडोबात फिरतेय दोन पिल्लांची जखमी वाघीण, वन अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष

googlenewsNext

संजय रानडे

नागपूर : मागील डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे लंगडत चालणाऱ्या दोन पिल्ले असणाऱ्या वाघिणीनेताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये पांगडी परिसरात पर्यटकांनाही शनिवारी हिरडीनाला नावाने ओळखली जाणारी ही वाघीण दिसली. 

आपल्या अन्य तीन छायाचित्रकार मित्रांसह पांगडी बफर परिसरात सफारीसाठी गेले असता ही वाघीण जवळून पाहिल्याचा दावा वन्यजीव छायाचित्रकार विश्वास उगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. तिच्या डाव्या पंजाचे हाड तुटलेले दिसले. चालतानाही तिला बराच त्रास होत होता. आपल्या भक्ष्याला ठार करून ती उभी असतानाच अचानक एक मोठा वाघ आला. मात्र, गंभीर जखमी असूनही आपल्या भक्ष्याचे रक्षण करण्यासाठी तिने वाघाशी बराच संघर्ष केला. ही वाघीण दोन पिल्ले वाढवत आहे, त्यांच्या पोषणासाठी ती पांगडी परिसरातील पाळीव जनावरांनाही मारू शकते. दुखापतीमुळे तिच्या चपळतेवर परिणाम झाला आहे, यामुळे मनुष्य-प्राणी संघर्ष होऊ शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. 
ताडोबा प्रकल्पाचे उपसंचालक (बफर झोन) कुशाग्र पाठक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या जखमी वाघिणीबद्दल दुजोरा दिला. खबरदारीचा उपाय म्हणून लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.

Web Title: An injured tigress with two cubs walking in the forest caught the attention of the forest officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.