अज्ञात वाहनाने बाईकस्वार युवकास चिरडले

By दयानंद पाईकराव | Published: February 2, 2024 10:26 PM2024-02-02T22:26:00+5:302024-02-02T22:26:24+5:30

अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बाईकस्वाराचा मृत्यू झाला.

An unknown vehicle crushed the biker youth | अज्ञात वाहनाने बाईकस्वार युवकास चिरडले

अज्ञात वाहनाने बाईकस्वार युवकास चिरडले

नागपूर : अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बाईकस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी १ फेब्रवारीला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश गणेश शेंडे (२२, रा. रॉय ढाबाजवळ, पारडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रकाश आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ३१, एफ. टी-७९०६ ने हैदराबाद हायवेने रॉय ढाबा समोरून जात होता.

अज्ञात वाहनचालकाने त्याच्या वाहनाला जोरदार धडक देऊन त्याला गंभीर जखमी केले. त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शरद भगतसिंग ढोले (२६, रा. संचेती शाळेजवळ, हुडकेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Web Title: An unknown vehicle crushed the biker youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.