आॅनलाईन जगात आत्मविश्वासाचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:08 AM2017-07-18T02:08:17+5:302017-07-18T02:08:17+5:30

सोशल मीडियाचा वापर आणि कॅशलेस व्यवहार आत्मसात करणे ही वर्तमान काळाची गरज झाली आहे.

Analyze the confidence of the world in the world | आॅनलाईन जगात आत्मविश्वासाचे पाऊल

आॅनलाईन जगात आत्मविश्वासाचे पाऊल

Next

पारिजातक प्रतिष्ठान : आॅनलाईन साक्षरता कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियाचा वापर आणि कॅशलेस व्यवहार आत्मसात करणे ही वर्तमान काळाची गरज झाली आहे. मात्र इंटरनेट आॅनलाईन जगात वावरताना आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घेणे आज अगत्याचे झाले आहे. त्यामुळे आम्हाला जमत नाही म्हणून निराश होण्यापेक्षा आॅनलाईन व्यवहार हाताळताना तंत्रज्ञान अधिक चांगल्या आणि सोप्या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. हे तंत्रज्ञान सर्व वयोगटातील नागरिकांना समजावे यासाठी पारिजातक प्रतिष्ठान आणि इंडियन वेब टेक्नालॉजीजच्यावतीने नि:शुल्क आॅनलाईन साक्षरता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
शेवाळकर सभागृह येथे आयोजित कार्यशाळेत तंत्रज्ञान विशेषज्ञ मोहिनी मोडक यांनी सोशल मीडिया आणि सुभाष गोरे यांनी कॅशलेस व्यवहारावर मार्गदर्शन केले. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियाचा वापर वर्तमान काळात जगण्याचा भाग झाला आहे. दुसरीकडे रोखरहित (कॅशलेस) व्यवहार ही आजच्या काळाची गरज झाली आहे. या आॅनलाईन गोष्टी आत्मसात करणे प्रत्येकासाठी निकडीचे झाले आहे.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मोहिनी मोडक यांनी मार्गदर्शन करताना माहितीच्या मायाजाळात नेमकी माहिती कशी शोधावी, संगणकाच्या की-बोर्डवरील स्पेशल कॅरेक्टर्सचा वापर, स्पेलिंग, शब्दकोश, हवामानाची माहिती, चलनबदल, गणित, फोटो बघणे आदींवर माहिती दिली. ई-मेल अकाऊंट कसे उघडावे, पासवर्ड, अटॅचमेंट डाऊनलोड करण्यास हॅकिंंग, ई-मेल सुरक्षा आदी विषयही मोडक यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर आदी सोशल मीडियाबाबतही त्यांनी विस्तृत माहिती दिली.

कॅशलेस व्यवहार कसे सुरक्षित
सुभाष गोरे यांनी कॅशलेस व्यवहारावर मार्गदर्शन केले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. इंटरनेटवर नेटबँकिंग आणि विविध सुविधांचे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्याचा वापर येत्या काळात वाढणार आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान शिकून त्याचा सुरक्षित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. एखादे अ‍ॅप्स इन्स्टॉल कसे करावे, कॅशलेस पेमेंटसाठी उपलब्ध असलेले सुरक्षित पर्याय, कार्ड स्वॅपिंग, मोबाईल बँकिंग याबाबत गोरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजक आणि पारिजातक प्रतिष्ठानचे संचालक डॉ. नीतेश खोंडे, लीना खोंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही टिप्स
व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा गैरवापर टाळण्यासाठी फिल्टर्स लावा
बँकेच्या व्यवहाराशी दीर्घकाळ वापरला जाणारा मोबाईल क्रमांक लिंक करा
भीम अ‍ॅप, महावितरणचे अ‍ॅप, ओला किंवा उबेर अ‍ॅपच्या सुविधेचा वापर चांगला
यू-ट्यूबचे व्हिडीओ म्हणजे माहितीचा खजिना
कोणत्याही प्रलोभनांना व खोट्या माहितीला बळी पडू नका
इंटरनेट वापरताना सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक

Web Title: Analyze the confidence of the world in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.