राज्यातील पुरातन महावृक्षांची होणार गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 09:58 PM2020-09-11T21:58:37+5:302020-09-11T22:00:56+5:30

गावोगावी आणि शहरात अनेक ठिकाणी वड, पिंपळ, आंबा, चिंच आदी प्रजातीची मोठमोठे आणि पुरातन वृक्ष जागोजागी आहेत. हे महावृक्ष ५० पासून ते १००-२०० वर्ष जुने आणि विशाल आहेत. अशा महावृक्षांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे अभियान राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे राबविले जात आहे.

The ancient giant trees of the state will be counted | राज्यातील पुरातन महावृक्षांची होणार गणना

राज्यातील पुरातन महावृक्षांची होणार गणना

googlenewsNext
ठळक मुद्देसामाजिक वनीकरण विभाग राबविणार अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गावोगावी आणि शहरात अनेक ठिकाणी वड, पिंपळ, आंबा, चिंच आदी प्रजातीची मोठमोठे आणि पुरातन वृक्ष जागोजागी आहेत. हे महावृक्ष ५० पासून ते १००-२०० वर्ष जुने आणि विशाल आहेत. अशा महावृक्षांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे अभियान राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे राबविले जात आहे. वृक्षांचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसे भारतात वृक्षांना सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त आहे. भारतीय संस्कृतीत साजरे होणारे वटपौर्णिमा, दसरा, गणेशोत्सव, हरतालिका आदी उत्सवांचा वृक्षांशी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी मोठमोठे वृक्ष जगवले आणि जोपासले आहेत. कोलकाताच्या बॉटनिकल गार्डनमध्ये असलेला २५० वर्ष जुना वटवृक्ष असो की अनंतनाग, आंध्र प्रदेशचा सव्वाचार एकरामध्ये पसरलेला विशाल वटवृक्ष असो, ही त्याच परंपरेची उदाहरणे आहेत. आपल्या महाराष्ट्रातही अशी प्राचीन व विस्तीर्ण झाडे गावोगावी आहेत. हे महावृक्ष केवळ वयाने आणि आकाराने मोठे नसून त्यांनी आपली स्वतंत्र अशी परिसंस्थाच तयार केली आहे. त्यामुळे या महावृक्षांची नोंदणी प्रेरणादायी ठरणारी असल्याचे मत सामाजिक वनीकरण विभागाने व्यक्त केले. याद्वारे ही झाडे कुठे आहेत, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, आदी माहिती गोळा केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे या वृक्षांचे संवर्धन करता येईल. यासाठी स्थानिक जनसामान्यांच्या, पर्यावरणप्रेमींच्या, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून ही नोंदणी केली जाणार आहे. वनेतर क्षेत्रामध्ये वड, आंबा, पिंपळ, जांभुळ, मोहा, साग, अर्जुन आदी प्रजातींच्या विशाल झाडांची नोंदणी करण्याचे निर्देश प्रादेशिक तसेच विभागीय वनअधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहे

Web Title: The ancient giant trees of the state will be counted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.