अन् रेल्वे ‘प्लॅटफॉर्म’वरच झाली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 08:06 PM2018-09-25T20:06:26+5:302018-09-25T20:09:14+5:30

मंगळवारी सकाळी दररोजप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक तीनवर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी व वैद्यकीय पथकाची धावपळ सुरू झाली. काही वेळातच ‘प्लॅटफॉर्म’च्या परिसरात तान्हुलीच्या रडण्याचा आवाज आला अन् उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची बरसात झाली. चक्क ‘प्लॅटफॉर्म’वर जन्म झालेल्या बालिकेचे या जगात झालेले स्वागत सर्वांनी अक्षरश: टाळ्याच्या कडकडाटात केले.

And delivery on the 'platform' | अन् रेल्वे ‘प्लॅटफॉर्म’वरच झाली प्रसूती

अन् रेल्वे ‘प्लॅटफॉर्म’वरच झाली प्रसूती

Next
ठळक मुद्देनागपूर रेल्वे स्थानकावरील घटना : कर्मचाऱ्यांनी दाखविली तत्परता

लोकमत न्यूज नेटवर्क   
नागपूर : मंगळवारी सकाळी दररोजप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक तीनवर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी व वैद्यकीय पथकाची धावपळ सुरू झाली. काही वेळातच ‘प्लॅटफॉर्म’च्या परिसरात तान्हुलीच्या रडण्याचा आवाज आला अन् उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची बरसात झाली. चक्क ‘प्लॅटफॉर्म’वर जन्म झालेल्या बालिकेचे या जगात झालेले स्वागत सर्वांनी अक्षरश: टाळ्याच्या कडकडाटात केले.
चक्रधरपूर निवासी कुंदन मुंडा (३५) हे पुणे येथे कार्यरत आहेत. आपली गर्भवती पत्नी अगस्ती मुंडा (२५) व आपल्या मुलासह ते गाडी क्रमांक १२१२९ आझादहिंद एक्स्प्रेसने पुण्याहून चक्रधरपूरकडे चालले होते. नागपूर स्थानकानजीकच अगस्ती मुंडा यांना प्रसववेदना सुरू झाल्या. एस-८ मधील सहप्रवाशांनी तत्काळ याची माहिती तिकीट तपासणी कर्मचाºयांना दिली. त्यानंतर त्वरित नागपूर रेल्वे स्थानकातील उपस्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य) यांना संपर्क करण्यात आला. तातडीने रेल्वे प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली व गाडी ‘प्लॅटफॉर्म’वर येत असताना रेल्वेच्या वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.श्रीजा यादेखील पोहोचल्या. ‘आरपीएफ’ जवान व सफाई कर्मचारी ‘प्लॅटफॉर्म’वर एकत्र झाले होते. गाडी थांबताच महिलेला त्वरित उतरविण्यात आले. मात्र वेदना जास्त प्रमाणात होत असल्याने त्यांना त्वरित ‘प्लॅटफॉर्म’वरील ‘वॉटर वेन्डिंग मशीन’जवळील ‘बेंच’वर ठेवण्यात आले. चारी बाजूंनी चादर लावण्यात आली व डॉ.श्रीजा यांनी वैद्यकीय पथकाच्या मदतीने तेथेच प्रसूती केली. अगस्ती मुंडा यांनी एका निरोगी बालिकेला जन्म दिला. त्यानंतर आई व मुलीला तत्काळ मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही धावपळ होत असताना अनेक लोकांची तेथे गर्दी जमली होती. प्रत्येक जणच प्रार्थना करत होता. प्रसूती झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे कुंदन मुंडा यांच्याकडे तर बोलण्यासाठी शब्दच नव्हते. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेला त्यांनी नमन केले.

Web Title: And delivery on the 'platform'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.